Source: Sakal Kolhapur
भुदरगड तालुका संघाची आज अध्यक्ष निवड
गारगोटी : भुदरगड तालुका शेतकरी सहकारी संघाची अध्यक्ष व उपाध्यक्ष निवड गुरुवारी (ता. २५) होत आहे. अध्यक्षपदासाठी प्रा. बाळ देसाई यांची निवड निश्चित मानली जाते. तर उपाध्यक्षपदी कोणाची वर्णी लागणार याबाबत उत्सुकता आहे. भुदरगड तालुका संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत आजी-माजी आमदार यांच्या सत्ताधारी आघाडीने विजय मिळविला. विद्यमान अध्यक्ष प्रा. बाळ देसाई यांनी संघाला गतवैभव प्राप्त करून दिले. या मुळे राष्ट्रवादी कॉंग्रेससह आघाडीतर्फे त्यांचे नाव निश्चित मानले जाते. उपाध्यक्षपदी आमदार गट, राहुल देसाई गट की काँग्रेस गटाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता आहे.