Source: Sakal Kolhapur
gad44.jpg/ 00440अत्याळ : विद्यांगण सार्वजनिक वाचनालयातर्फे पुंजी लोकसाहित्याची या पुस्तकाचे प्रा. शिवाजी भुकेले, प्रा. पी. डी. पाटील यांच्या हस्ते प्रकाशन झाले.
पुंजी लोकसाहित्याची पुस्तकाचे प्रकाशनगडहिंग्लज: अत्याळ (ता. गडहिंग्लज) येथील विद्यांगण सार्वजनिक वाचनालयातर्फे पुंजी लोकसाहित्याची या पुस्तकाचे प्रकाशन झाले. लोकसेवा कलापथक, आजी-माजी मुंबईकर मंडळातर्फे आयोजन केले होते. संत साहित्याचे अभ्यासक प्रा. शिवाजी भुकेले अध्यक्षस्थानी होते. लोकसाहित्याचे अभ्यासक प्रा. पी. डी. पाटील व पुणे विभाग ग्रंथालय संघाचे माजी कार्याध्यक्ष दत्ता देशपांडे प्रमुख उपस्थित होते. प्रा. पाटील यांनी भिलारच्या धर्तीवर अत्याळमध्ये पुस्तकाचे गाव तयार करावे असे आवाहन केले. प्रा. भुकेले, शाहिर शंकर बाटे, प्रा. एस. आर. पाटील, शैलेश पाटील यांचीही भाषणे झाली. विजय पाटील यांनी स्वागत केले. वाचनालयाचे अध्यक्ष नारायण सुतार यांनी पुस्तकाविषयी माहिती दिली. माधुरी आडसुळे यांनी सूत्रसंचालन केले. विजय मोहिते यांनी आभार मानले.