Source: Sakal Kolhapur
00286गडहिंग्लज : बेळगावमधील स्पर्धेचे विजेतेपद पटकावलेल्या आंबेडकर क्लबच्या खेळाडूसमवेत संघाचे पदाधिकारी व मार्गदर्शक.
गडहिंग्लजचा संघ बेळगावात भारीफुटबॉल स्पर्धा; दोन गटाचे विजेतेपद, मोरे, कांबळे ठरले सर्वोत्कृष्ठसकाळ वृत्तसेवागडहिंग्लज, ता. ३ : बेळगाव येथे मॅजिक स्पोर्टींग क्लब आयोजित समर फुटबॉल चॅम्पीयनशीप स्पर्धेत येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर फुटबॉल क्लबने ११ व १५ वर्षाखालील गटाचे विजेतेपद पटकावले. आकर्षक चषक, मेडल्स व प्रमाणपत्र देवून क्लबला गौरविण्यात आले. क्लबचा रितेश मोरे व विश्वजित कांबळे यांना सर्वोत्कृष्ठ खेळाडूचा बहुमान मिळाला. अध्यक्ष महेश सलवादे, शेखर बारामती, अमर मांगले, रश्मिराज देसाई, राकेश सलवादे आदींनी यशस्वी संघांचा गौरव केला. १५ वर्षाखालील स्पर्धेत आंबेडकर क्लबने अंतिम सामन्यात के. आर. शेट्टी एफसीचा १-० फरकाने पराभव केला. उत्तरार्धात शेट्टी एफसीच्या बचावफळीच्या चुकीचा फायदा घेत आंबेडकर क्लबच्या रितेश मोरे याने गोल केला. हीच आघाडी शेवटपर्यंत कायम राहून विजेतेपद पटकावले. ११ वर्षाखालील स्पर्धेत आंबेडकर संघाने यजमान मॅजिक स्पोर्टींगचा सडनडेथवर पराभव केला. सडनडेथमध्ये विरेंद्र कांबळेने विजयी गोल करत संघाची विजयीश्री खेचून आणली. एकूण स्पर्धेत लल्या कांबळे, विश्वजित कांबळे, समर्थ भालेकर, सुमित कांबळे, शुभम राठोड, ज्ञानेश कवाडे, सिच्यान पोवार यांनी गोल करुन चमक दाखविली. विजयी संघाला इक्बाल नंदीकर, रुनी सलवादे यांचे मार्गदर्शन, तर अक्रम पटेल, केतन माळगी, चेतन खातेदार, प्रशांत कांबळे, सोन्या कांबळे, साहिल दुधी यांचे सहकार्य मिळाले. दोन गटातील विजयी संघात आयान पटेल, भय्या माने, आर्यन घारवे, लल्या कांबळे, अली मुर्तजा पटेल, यासीन नंदीकर, समर्थ भालेकर, अलोक ढंगण्णावर, अरमान मुल्ला, विरेंद्र कांबळे, अनूप विटेकरी, विश्वजित कांबळे (११ वर्षे), ज्ञानेश कवाडे, सुमित कांबळे, शुभम राठोड, पवन गुंठे, साई म्हेत्री, लक्ष्मण गुरव, गणेश कोड्याळे, रोहित पोवार, रितेश मोरे (१५ वर्षे) यांचा समावेश आहे.