गडमुडशिंगीत भाजी विक्रेत्या पती-पत्नीस मारहाण

Share on facebook
Facebook
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

गडमुडशिंगीतीलदांपत्याला मारहाणदोघांवर गुन्हा; शिवीगाळीतून प्रकारगांधीनगर, ता. २२ : शिवीगाळ केल्याचा जाब विचारणाऱ्या भाजी विक्रेत्या पती-पत्नीचा चावा घेऊन जखमी केल्याबद्दल रणजित सदाशिव माळी व त्याची सासू लता तानाजी गवळी (दोघेही गडमुडशिंगी, ता. करवीर) यांच्यावर गांधीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला. भाजी विक्रेते कृष्णात शामराव रानगे आणि त्यांची पत्नी (दोघेही गडमुडशिंगी) जखमी आहेत. हा प्रकार गडमुडशिंगी येथील नवरत्न चौकातील भाजी मार्केटमध्ये झाला.कृष्णात रानगे भाजी मार्केटमध्ये शेजारी असणाऱ्या दशरथ हनुमंत गवळी यांच्याशी बोलत होते. त्याचवेळी समोरच असणारे रणजित सदाशिव माळी यांनी कृष्णात रानगे यांना शिवीगाळ केली. शिवीगाळ का करतोस, असा जाब कृष्णात रानगे आणि त्यांच्या पत्नीने रणजित माळी यांना विचारला. त्यावेळी रणजित माळी याने सासू लता तानाजी गवळी यांना बोलावून घेऊन रानगे पती-पत्नीला पुन्हा शिवीगाळ करत मारहाण केली. त्यांचा चावा घेऊन दोघांनाही जखमी केले. याबाबत कृष्णात रानगे यांनी गांधीनगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून, रणजित माळी आणि त्याची सासू लता गवळी यांच्यावर गुन्हा नोंद झाला आहे.

eZy News
LATEST
>>कोल्हापूरचा विकास जयपूरसारखा करू; केसरकर>>गुंडाचा डोक्यात दगड घालून खून>>आजरा येथे जुगार आड्यावर छापा.>>झुलन गोस्वामीची अखेरची लढत>>Lumpy skin disease : लम्पी स्कीनप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका>>कागल : राष्ट्रवादी पक्षाची विजयाची नांदी – आमदार हसन मुश्रीफ>>चंदगडी हिसका दाखवू>>शिराळा : विश्वास कारखाना वार्षिक सभा>>राक्षीतील घरफोड्याला अटक; वाघबीळ घाटात कारवाई, घरफोडीतील सोन्या-चांंदीचे दागिने जप्त>>शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ देणार नाही – मंत्री केसरकर>>गांधी समजून घेताना>>कोल्हापूरला जयपूर करू -नुतन पालकमंत्री दीपक केसरकर>>म.ह. शिंदे महाविद्यालय>>जातिविहीन व्हा, उच्चनिचतेच्या भिंती जमीनदोस्त करा”>>अन्नपुर्णा’ शुगरचा सोमवारी द्वितीय गळीत हंगाम शुभारंभ>>‘सीबीआय’ कडून कागलमधील तरुणाची चौकशी>>लम्पी>>लव्हटे परिसंवाद>>कोजिमाशिची आज वार्षिक सभा>>नवरात्रोत्सव
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: