Source: Sakal Kolhapur
00988गगनबावडा : येथील तहसिल कार्यालयासमोर ध्वजवंदन करताना आमदार सतेज पाटील.
गगनबावडा तालुकाअसळज : गगनबावडा तालुक्यात महाराष्ट्र दिन उत्साहात झाला. गगनबावडा येथील तहसिल कार्यालयासमोर मुख्य शासकीय ध्वजवंदन आमदार सतेज पाटील यांच्या हस्ते सकाळी ८ वाजता झाले. या वेळी राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली. राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत परशुराम विद्या मंदिर व कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयाच्या विद्यार्थीनीनी गायले. गगनबावडा पोलिस ठाण्यातर्फे ध्वजास सलामी देण्यात आली. जिल्हा परिषद माजी अध्यक्ष बजरंग पाटील, तहसिलदार डॉ. शैलजा पाटील, गटविकास अधिकारी माधुरी परीट, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या सरिता देशमुख, डॉ. डी. वाय. पाटील कारखान्याचे उपाध्यक्ष बी. डी. कोटकर, संचालक मानसिंग पाटील, सहदेव कांबळे, चंद्रकांत खानविलकर, संजय पडवळ, रामचंद्र पाटील, महादेव पडवळ, बहुउदेशीय संस्थेचे अध्यक्ष विलास पाटील, गोकुळ संचालक बयाजी शेळके, मुख्याध्यापक रंगराव गोसावी, सहायक पोलिस निरीक्षक दिपक भांडवलकर, वन विभागाचे सरिता पाटील, मंडल अधिकारी उदय लांबोरे, सामाजिक वनीकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग याच्यासह तहसिल विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. पंचायत समिती आवारात गटविकास अधिकारी माधुरी परीट यांच्या हस्ते तर गगनबावडा ग्रामपंचायतसमोर सरपंच मानसी कांबळे यांच्या हस्ते ध्वजवंदन झाले.