गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईच्या टॉप-10 टार्गेटमध्ये पहिल्या क्रमांकावर सलमान खान! एनआयएच्या चौकशीत मोठा खुलासा

Facebook
LinkedIn
WhatsApp
एनआयए गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईची चौकशी करत आहे. या चौकशीदरम्यान अनेक मोठे खुलासे झाले आहेत.

Source: Lokmat National

राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या चौकशीत कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्नोईने मोठी कबुली दिल्याचे समोर आले आहे. बॉलिवूड अभिनेता सलमान खान त्याच्या टॉप 10 टार्गेट लिस्टमध्ये पहिल्या क्रमांकावर असल्याची कबुली लॉरेन्सने दिली आहे. “मला सलमान खानला कोणत्याही किंमतीत मारायचे आहे”, अशी कबुली त्याने दिल्याचे सांगितले जात आहे. याशिवाय त्याने टॉप-10 च्या यादीत समाविष्ट असलेल्या लोकांची नावे देखील दिली आहेत. तिसर्‍या क्रमांकावर मनदीप धालीवाल आहे, त्यांची गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये हत्या झाली होती.

एनआयएच्या चौकशीत बिश्नोईने सांगितले की, सलमान खानने जोधपूरमध्ये काळवीटाची शिकार केली ज्याची बिश्नोई समाज पूजा करतो. याच कारणामुळे त्याला सलमान खानला मारायचे आहे. सलमान खानची रेकी करण्यासाठी संपत नेहराला मुंबईत पाठवल्याची कबुलीही त्याने दिली.

२ हजारांची नोट बदलताना ओखळपत्र का नको? RBI-SBI विरोधात दिल्ली हायकोर्टात याचिका

आपल्या दुसऱ्या टार्गेटचा संदर्भ देत बिश्नोईने शगुनप्रीतचे नाव घेतले आहे. शगुनप्रीत पंजाबचा गायक सिद्धू मुसेवालाची मॅनेजर आहे. शगुनप्रीतने शुटरांना म्हणजेच लॉरेन्सच्या अगदी जवळ असलेल्या विक्की मुद्दुखेडाच्या हत्येतील आरोपींना लपण्यासाठी मदत केली होती.

एनआयएकडे केलेल्या चौकशीत या गुंडाने सांगितले की, विकी मुद्दुखेडा यांच्या हत्येचा कट अमित डागर आणि कौशल चौधरी यांनी रचला होता. यामुळेच त्यांना अमित डागरला संपवायचे असल्याचे सांगितले.

लॉरेन्सने सांगितले की, बंबिहा ही माझी ओळखीची शत्रूची टोळी आहे, देवेंद्र बंबिहाच्या मृत्यूनंतर त्याची गँग सुखप्रीत सिंग कार्यरत आहे. माझा जवळचा मित्र अमित शरणच्या हत्येमागे सुखप्रीत सिंगचा हात आहे, त्यामुळे तेही माझ्या टारगेटवर आहेत,असंही त्याने सांगितले. 

Marathi News
LATEST
>>कोल्हापूर : वेतवडे येथे धामणी नदीत बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू>>कांदा झाला स्वस्त>>पेठवडगाव: अपघात जोड>>पोलीस कोठडी>>पिवळे सोने झाले मातीमोल>>युथ समिट ऑफ समर अधिवेशन>>सीपीआर रक्षकावर हल्ला गुन्हा दाखल>>Kolhapur : हत्तीवरून मिरवणुकीने कन्याजन्माचे स्वागत; पाटील कुटुंबीयांचा आदर्श उपक्रम>>लॉरी ऑपरेटर्स हेल्मेट>>नेते, संचालक भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पाठीशी>>मुश्रीफ कार्यक्रम>>नागोजीराव पाटणकर हायस्कूल बातमी>>ओबीसी आरक्षण वाढवण्याचा निर्णय चुकीचा ः ॲड.इंदुलकर>>‘आरसीसी-एसईटी’साठी रविवारी स्कॉलरशिप परीक्षा>>भाजप कार्यालय प्रवेश>>जंगम समाज संस्कार शिबीर>>मराठा महासंघ मेळावा>>झूम प्रकल्प पाहणी>>सौंदाळेच्या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू>>प्रकाशन
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: