fbpx
Site logo

कोल्हापूर : पेठवडगाव नगरपालिकेच्या दवाखान्याचेच बिघडले ‘आरोग्य’

Facebook
LinkedIn
WhatsApp
किणी; पुढारी ऑनलाईन : कायमस्वरूपी डॉक्टर नाही, तातडीच्या रुग्णांसाठी काही औषधे सोडली तर कोणत्याही सुविधा नाहीत, दवाखान्याचे छत देखील ताडपत्रीने झाकण्यात आलेले आहे. पेठवडगाव नगरपालिकेच्या दवाखान्याचेच ‘आरोग्य’ बिघडले असुन पेठवडगावकरांचे आरोग्य रामभरोसे झाले आहे. तातडीने पेठवडगावसाठी किमान शंभर ते दीडशे बेडच्या रुग्णालयाची गरज आहे.

Source: Pudhari Kolhapur

किणी; पुढारी ऑनलाईन : कायमस्वरूपी डॉक्टर नाही, तातडीच्या रुग्णांसाठी काही औषधे सोडली तर कोणत्याही सुविधा नाहीत, दवाखान्याचे छत देखील ताडपत्रीने झाकण्यात आलेले आहे. पेठवडगाव नगरपालिकेच्या दवाखान्याचेच ‘आरोग्य’ बिघडले असुन पेठवडगावकरांचे आरोग्य रामभरोसे झाले आहे. तातडीने पेठवडगावसाठी किमान शंभर ते दीडशे बेडच्या रुग्णालयाची गरज आहे.

केंद्र व राज्य शासनाकडून नागरिकांना मोफत उपचार मिळावे म्हणून विविध योजनांद्वारे कोट्यवधी रुपये खर्च केले जात आहे. तर राज्य शासनाकडून ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ या अभियान राबविण्यात येत आहे. यात ग्रामीण भागातील १८ वर्षावरील महिला, माता, गरोदर महिलांचे आरोग्य सुरक्षित राहावे म्हणून विविध शिबिरांचे आयोजन करण्यात येत असताना १३६ वर्षे जुनी नगरपालिका असणाऱ्या पेठवडगाव शहरात मात्र, शासकीय आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे.

१९४० साली छ. राजाराम महाराज यांनी तत्कालीन म्युनिसपालिटी आणि इलाखा पंचायत यांच्या सहभागातून प्रशस्त असे रुग्णालय उभारले. या ठिकाणी वडगाव शहरासह आजूबाजूच्या खेड्यातील रुग्णांवर उपचार होऊ लागले. चांगला प्रतिसाद बघून १९७५ साली या रुग्णालयाचे हस्तांतर पालिकेकडे करण्यात आले. अनेक वर्षे हे रुग्णालय मध्यम व गोरगरीब वर्गीयांच्या आरोग्याचे आधारस्थान राहिले, सर्दीखोकल्यापासून प्रसूतीपर्यंतचे सर्व रुग्ण या ठिकणी उपचार घेऊ लागले. मात्र, गेल्या काही वर्षात या रुग्णालयाकडे कुणीच गांभीर्याने लक्ष न दिल्याने रुग्णालयाचेच ‘आरोग्य’ बिघडले आहे.

या ठिकाणी सेवा देणाऱ्या शासकीय वैद्यकीय अधिकारी २०१८ साली सेवानिवृत्त झाल्यापासून येथे आता एक फार्मासिस्ट, एक परिचारिका व एक दाई असा शासकीय स्टाफ असून, कंत्राटी तत्वावर एक डॉक्टर, एक फार्मासिस्ट, दोन परिचारिका, एक क्लार्क व एक कॉम्प्युटर ऑपरेटर यांची नेमणूक करण्यात आली आहे. दररोज सरासरी ८० ते १०० रुग्णांचा केसपेपर होतो. तर सोमवारी म्हणजे, आठवडी

बाजाराच्या दिवशी ही संख्या १३० ते १५० पर्यंत जाते. मात्र, ठराविक वेळेतच रुग्ण तपासणी केली जाते.
२०१८ पर्यंत या ठिकाणी गुन्ह्यातील रुग्ण, संशयित आरोपी यांची तपासणी होत असे, शिवाय अपघाती किंवा अकस्मात मृत्यू झालेल्या मृतदेहाचे विच्छेदनही होत असे. आता मात्र, अशा तातडीच्या स्वरूपातील कामांसाठी पारगाव येथील ग्रामीण रुग्णालयात लोकांना जावे लागत आहे. या रुग्णालयाच्या इमारतीची कौले जीर्ण झाली असून अनेक ठिकाणी गळती सुरू झाल्याने कौलावर प्लास्टिक ताडपत्रीचे आच्छादन घालण्यात आले आहे.

पेठवडगाव शहराची सुमारे ३५ हजार लोकसंख्या व आजुबाजूच्या जवळपास ४० गावातील लोकांची सोय करायची झाल्यास किमान १०० ते १५० बेडसोबत रुग्णालयात नामांकित दर्जाचे एमबीबीएस डॉक्टर, एमएस सर्जन आदी पदवीप्राप्त डॉक्टर, प्रशिक्षित कर्मचारी वर्ग उपलब्ध व्हावेत. यासोबत ऑपरेशन थिएटर, सिटी स्कॅन, एमआरआय, रक्त लघवी तपासणीकरिता लॅबोरेटरी अशा सर्वसुविधायुक्त सुसज्ज रुग्णालय उभारण्याची काळाची गरज आहे.

सुमारे ५५ गुंठे क्षेत्रफळात रुग्णालय, आंतररुग्णांसाठी खोल्या, स्टाफ क्वार्टर्स, शवविच्छेदन गृह, व मोकळी जागा आहे. हे रुग्णालय १९७५ ला पालिकेकडे हस्तांतरित झाले असले तरी जागा मात्र, जिल्हा परिषदेच्या नावावर असल्याने ती जागा पालिकेकडे वर्ग करण्याची गरज आहे.

रुग्णालयाची उभारणी – सन १९४०
पालिकेकडे हस्तांतरण – सन १९७५
लोकसंख्या – २०११ ला २५६५१, सध्या अंदाजे ३५०००
दररोजचे केसपेपर – ८० ते १००
पर्मनंट कर्मचारी – ३
कंत्राटी कर्मचारी – ६

हेही वाचा : 

Marathi News
[pj-news-ticker]
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: