Source: Sakal Kolhapur
९९९७६रत्नागिरी ः येथील स्पर्धेत दोन चाकावर रिक्षा चालवण्याचा थरार अनुभवायाला मिळाला.
रत्नागिरीतील स्पर्धेत दिंडे, पवार यांची रिक्षा ठरली सुंदरकोल्हापूर : रत्नागिरी येथील श्री स्वराज्य प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या रिक्षा सुंदरी स्पर्धेचे विजेतेपद कोल्हापूरच्या अविनाश दिंडे आणि संकेत पवार यांनी पटकावले. रविवारी (ता. ३०) २०१९ ते २०२३ आणि २०१९ पूर्वीच्या अशा दोन गटात रिक्षा सौदर्य स्पर्धा घेण्यात आली होती. यामध्ये कोल्हापूर, निपाणी, मुंबई, पुणे, रायगड जिल्ह्यातील २५ जणांनी सहभाग घेतला. पालकमंत्री उदय सामंत, उद्योजक किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली स्वराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष तुषार सावळी, बाबय भाटकर यांच्या संकल्पनेतून ही स्पर्धा झाली. स्पर्धेचा निकाल असाः अविनाश दिंडे (कोल्हापूर), समीर बोले (संगमेश्वर), प्रसाद दुर्गावळे (दापोली), अनिकेत पवार (कोल्हापूर), तर दुसऱ्या गटात संकेत पवार (कोल्हापूर), शिवांश अडूरकर (कोल्हापूर), रईस (बेळगाव), आरव शिंदे (कराड) यांनी क्रमांक मिळविले. स्पर्धेतील विजेत्यांना २१,००० रुपये, ११,००० रुपये, ८००१ रुपये आणि ५००१ रुपये रोख रक्कम, आकर्षक चषक आणि मानाचा फेटा देऊन गौरविण्यात आले.