Source: Sakal Kolhapur
`कोलेकर’, रोटरी क्लबयांच्यात सामंजस्य करारनेसरी : येथील तुकाराम कृष्णाजी कोलेकर कला आणि वाणिज्य महाविद्यालय व समाजसेवी संस्था रोटरी क्लब ऑफ अतिग्रे यांच्यात विविध बाबींवर सामंजस्य करार झाला. कोलेकर महाविद्यालयाकडून प्राचार्य डॉ. एस. बी. भांबर व रोटरी क्लब यांच्याकडून प्रेसिडेंट यास्मिन मणेर यांनी स्वाक्षऱ्या केल्या. सामंजस करारा अंतर्गत महाविद्यालयाचा विकास तसेच विविध उपक्रम राबवण्याबाबत लागणारे अर्थसहाय्य यागोष्टी नमूद केल्या आहेत. विद्यार्थ्यांसाठी भौतिक सोयी-सुविधा, व्यावसायिक अभ्यासक्रम, आरोग्य सेवा, बौद्धिक आणि कलात्मक कौशल्य पुरवणे, शास्त्रीय, सामाजिक आणि पर्यावरणीय जागरूकता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करणे असे अनेक उद्देश समोर ठेवून सामंजस्य करार केला आहे. कराराच्या देवाण-घेवाणप्रसंगी यास्मिन मणेर, डॉ. एस. बी. भांबर, प्रांतपाल डॉ. प्रशांत कांबळे उपस्थित होते.