loader image

Archives

कोगनोळी येथील अवैध वाहतुकीबाबत राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा

बाबासो हळिज्वाळे

कोगनोळी : कोगनोळी मधील महामार्गावरील टोल नाका चुकवण्यासाठी कोगनोळी मार्गे अवैध वाहतुकीचा सुळसुळाट झाला होता. या वाहतुकीमुळे अनेकांचा बळी गेलेला आहे. या पार्श्वभूमीवर कोगनोळी येथील अवैध वाहतूक कायमची बंद व्हावी, जर ही अवैध वाहतूक दहा दिवसात बंद झाली नाही तर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येईल, असा इशारा कोगनोळी ग्रामस्थ व पत्रकार संघाच्या वतीने निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना देण्यात आला.

या निवेदनाच्या प्रती प्रांताधिकारी, तहसीलदार, मंडल पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांनाही देण्यात आलेले आहेत. या निवेदनावर माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज पाटील, प्राथमिक कृषी पत्तीन संघाचे चेअरमन अनिल चौगुले, माजी तालुका पंचायत सदस्य बाळासाहेब कागले, माजी ग्रामपंचायत सदस्य मारुती कोळेकर, कृष्णात खोत, युवराज कोळी यांच्यासह अनेक शेकडो नागरिकांच्या सह्या आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी, की राष्ट्रीय महामार्गावरील टोल नाका चुकविण्यासाठी चार चाकी खाजगी वाहनांपासून सोळा चाकी अवजड वाहनांपर्यंत सर्वच वाहने कोगनोळी गावातून प्रवास करतात. याच मार्गावर अनेक शाळा, आठवडी बाजार, विद्यार्थी, शेतकरी व नागरिकांची ये-जा सुरू असते.

काही दिवसांपूर्वीच एका तरुणाचा या अवैध वाहतुकीमुळे बळी गेला. त्यामुळे ही अवैध वाहतूक पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. या अवैध वाहतुकीबाबत नागरिकांतून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. याचीच दखल घेऊन कोगनोळी ग्रामस्थांच्या वतीने व पत्रकार संघाच्या वतीने जिल्हाधिकारी एम जी हिरेमठ यांना लेखी निवेदन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष पंकज पाटील यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले.

यासाठी प्रशासकीय अधिकारी, पोलीस प्रशासन, लोकप्रतिनिधी व राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दहा दिवसांचा अल्टिमेटम देण्यात आला असून या दहा दिवसात ही अवैध वाहतूक बंद झाली नाही, तर राष्ट्रीय महामार्ग रोखण्यात येईल असा इशाराही ग्रामस्थांच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.

यावेळी जिल्हाधिकारी यांनी योग्य ती कार्यवाही करून अवैध वाहतूक रोखण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन ग्रामस्थांना दिले. यावेळी तात्यासाहेब कागले, पूनम डांगरे, राजू शिंत्रे, कृष्णात भोजे, संजय पाटील यांच्यासह कोगनोळी पत्रकार संघाचे विठ्ठल कोळेकर, अनिल नवाळे, बाबासो हळिज्वाळे, राहुल मिस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.

.sponsored-poll{clear:both; margin-bottom: 20px; background:#f2f2f2; padding-bottom: 1px;} .sp-poll-head{background:#538ed5; color: #fff; padding:10px 20px; font-size: 20px; line-height: 25px; margin-bottom: 20px;} .sp-poll-widget{padding: 10px; margin: 0px 5px 5px; background:#e6e6e6; position: relative;} .sponsored-poll:after, .sp-poll-widget:after{content:”; display: block; clear: both;} .sp-poll-question{font-weight: 500;} .article-page .article-body p.sp-options{width: 100%; text-align: center; margin-bottom: 0px;} .sp-options span{display: inline-block; vertical-align: middle; margin: 0 10px;} .sp-options span input,.sp-options span label{display: inline-block; vertical-align: middle; margin: 0px; } .sp-options span input{margin-right: 5px;} .sp-options span.values{font-weight: bold;} .sp-poll-widget.poll-submitted:before{content: ”; display: block; position: absolute; left: 0; top: 0; right: 0; bottom: 0; z-index: 1; background:rgba(255,255,255,0.8);} .sp-options-mobile{display: none;} @media all and (max-width:767px){ .sp-poll-head{margin-bottom: 10px; padding: 5px 10px; font-size: 18px; line-height: 23px;} .article-content .article-contentText p.sp-options{width: 100%; display: table; margin-bottom: 5px;} .sp-options span input{margin-right: 2px;} .sp-options span{padding: 0px; margin:0px 5px; text-align: center; display: table-cell;} .sp-options span:first-of-type{margin-left: 0px; padding-left: 0px;} .sp-options span:last-of-type{margin-right: 0px;} .sp-options span.values{display: none;} .article-content .article-contentText p.sp-options-mobile{display: block; margin-bottom: 5px; padding: 0px 10px;} .sp-options-mobile .values{float:left; font-weight: bold; display: block; line-height: 20px;} .sp-options-mobile .values:nth-of-type(2){float:right;} .sp-options-mobile:after{display: block; content:”; clear: both;} } @media all and (max-width:320px){ .article-content .article-contentText p.sp-options-mobile{padding: 0px 5px;} } $(document).ready(function(){function a(a){var o=document.cookie.match(“(^|;) ?”+a+”=([^;]*)(;|$)”);return o?o[2]:null}function o(a,o){var t=new Date;t.setTime(t.getTime()+31536e6),document.cookie=a+”=”+o+”;expires=”+t.toUTCString()+”;path=/;domain=lokmat.com”}if(null==a(“survey2_status”)||null==a(“survey2_status”)){$(“.article-content p:last”).after(“

Comments

mood_bad
  • No comments yet.
  • chat
    Add a comment