Source: Sakal Kolhapur
00983प्रकाश देसाई
00982अजित पाटील
देसाई सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी प्रकाश देसाईअसळज : असंडोली (ता. गगनबावडा) येथील कै. लहू बाळा देसाई सेवा संस्थेच्या अध्यक्षपदी प्रकाश देवाप्पा देसाई यांची, तर उपाध्यक्षपदी अजित शिवाजी पाटील यांची बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेची पंचवार्षिक निवडणुक नुकतीच बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सहाय्यक निबंधक अनिता शिंदे यांनी काम पाहिले. निवडीप्रसंगी कृष्णात देवाप्पा देसाई, अशोक लहू देसाई, गोविंद गणपती उगवे, गजानन देवाप्पा देसाई, हणमंत सत्तू कुंभार, शामराव धोंडी हंकारे, विलास भाऊ शिंदे, बाजीराव देवाप्पा देसाई, माया अशोक देसाई, रेश्मा गजानन देसाई, सचिव कोंडीराम बाळकू पाटील, सहाय्यक सचिव संभाजी महादेव पडवळ आदी उपस्थित होते.