Source: Lokmat Health
अॅड. प्रवीण निकम,समता सेंटर, स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक
सध्या महाराष्ट्र झपाटयाने ग्लोबल स होण्याकडे झुकत असला तरी याच महाराष्ट्रात ‘मासिक पाळी विषयी अजूनही गैरसमज असल्याचे दिसून येत आहेत. एकीकडे कौमार्य चाचणी व त्या आधारित प्रकाराविषयी वादळ उठले •असताना मासिक पाळीच्या गैरसमजामुळे उल्हासनगरमध्ये झालेल्या धक्कादायक प्रकाराने अनेक प्रश्न अनुत्तरित राहिले आहेत. या परंपरांच्या बेड्या खरं तर कधीच मोडून टाकण्याची गरज होती. पण, अजूनही असे प्रकार सर्रासपणे सुरू आहेत. १२ वर्षांच्या मुलीला पहिली मासिक पाळी आल्याची कल्पना भावाला नसल्याने गैरसमजातून त्याने सख्ख्या बहिणीची हत्या केली. ज्या वयात जगण्याची उमेद मिळावी, भक्कम आधार पाठीशी हवा होता, तेव्हा ती हिंसेची शिकार झाली. या सगळ्यात मोठ्या प्रमाणात मासिक पाळी समज -गैरसमज व लैंगिक शिक्षण यावर काम करण्याची विशेष गरज निर्माण झाली आहे.
‘लैंगिक शिक्षण’ हा शब्द जरी उच्चारला तरी कित्येकांच्या भुवया उंचावतात. पण, लहानपणापासून लैंगिक शिक्षणाविषयी धडे हसत-खेळत देणे आवश्यक आहे. ते योग्य वय काय? हे लैंगिक शिक्षण मुलांना कसे द्यावे? तर आपला मुलगा असो वा मुलगी एक माणूस म्हणून जगताना कोवळ्या वयात आपलेपणाचा विश्वास निर्माण होईल, असे वातावरण घरी निर्माण करावे. वेगवेगळ्या माध्यमांतून मुलांना शरीराची ओळख करून द्यावी आणि लैंगिक अंगांबद्दल समजेल व उमजेल अशा गोष्टी साध्या व सोप्या भाषेत सांगाव्यात. जेणेकरून त्यांना ‘आपल्या शरीरावर, आपलाच हक्क आहे’ ही जाणीव निर्माण होते. चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श यातील फरक सांगावा आणि तो कसा ओळखावा है गोडीने सांगितले तर त्या वयात विश्वासाची जाणीव निर्माण होते. तसेच लैंगिक शोषणाला तेदेखील विरोध करतात. याविषयी शाळेमध्ये अजूनही उघडपणे बोलले जात नाही.
तुम्ही असा संवाद साधता का?
इंटरनेटचा वाढता वापर…..