Source: Sakal Kolhapur
gad54.jpg28292मुगळी : मुगळी ग्रामस्थांतर्फे सतेज पाटील यांचा मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मल्लिकार्जुन आरबोळे, अॅड. दिग्विजय कुराडे, संग्रामसिंह नलवडे, विद्याधर गुरबे, सोमगोंडा आरबोळे आदी उपस्थित होते.—————————केंद्र सरकारकडून घटनेची पायमल्लीआमदार सतेज पाटील : मुगळीत जनसंवाद पदयात्रेची सांगतासकाळ वृत्तसेवानूल, ता. ५ : केंद्रात नऊ वर्षापासून भाजपचे सरकार आहे. या सरकारने सर्वसामान्य जनतेसाठी अमृतकाळ आणला असे टाहो डून भाजपवाले सांगत आहेत. पण, हा अमृतकाळ कोणासाठी? नऊ वर्षात शेतकऱ्यांना काय दिले हा संशोधनाचा विषय आहे. भारतीय राज्यघटना जगात सर्वश्रेष्ठ असताना तिची पायमल्ली करण्याचे काम सरकार करीत आहे. सर्वसामान्यांचे हक्क सुरक्षित राखण्यासाठी भाजप हटावची भूमिका घ्या, असे आवाहन काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी केले. मुगळी (ता. गडहिंग्लज) येथे जनसंवाद पदयात्रेच्या दुसऱ्या दिवसाची सांगता झाली. याप्रसंगी आमदार पाटील बोलत होते. मुत्नाळ, निलजी, नूल या गावातून पदयात्रा निघाली. गावागावातून फुलांच्या वर्षावात व वाद्यांच्या गजरात पदयात्रेचे स्वागत झाले.आमदार पाटील म्हणाले, ‘जनसंवाद यात्रेच्या निमित्ताने ग्रामीण भागात फिरलो. शेतकरी, कामगार, महिला आणि सामान्य जनतेला भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. या सरकारने काँग्रेसने राबविलेल्या योजनांचेच बारसे घालण्याचे काम केले आहे.’ कल्लाप्पा अमीनभावी यांनी मानपत्राचे वाचन केले. मुगळी ग्रामस्थांतर्फे मानपत्र देऊन सतेज पाटील यांचा सत्कार केला. उपसरपंचपदी निवडीबद्दल जोतिबा माने यांचा सत्कार झाला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव शशांक बावस्कर, राजू खमलेटी, अॅड. दिग्विजय कुराडे, राजगोंडा पाटील यांचीही भाषणे झाली. संग्रामसिंह नलवडे, डॉ. यशवंत चव्हाण, बाबासाहेब चौगुले, विक्रम चव्हाण, राणी खमलेटी, विद्याधर गुरुबे आदी उपस्थित होते. हिरा शुगरचे संचालक सोमगोंडा आरबोळे यांनी स्वागत केले. सरपंच मल्लिकार्जुन आरबोळे यांनी प्रास्ताविक केले. ———–सरकारच्या पायाखालील वाळू घसरलीआमदार पाटील म्हणाले, ‘महाराष्ट्रात जाती-पातीचे विष पसरुन समाजामध्ये दरी निर्माण करण्याचे काम भाजपचे लोक करीत आहेत. अशा दुग्गलनीतीने काम करणाऱ्या सरकारला हाकलून लावण्याची भूमिका आपल्याला घ्यावी लागेल. केंद्र सरकारच्या विरोधात सर्वपक्षीय इंडिया आघाडी निर्माण झाल्याने या सरकारच्या पायाखालची वाळू आता घसरत चाललेली आहे.