Source: Sakal Kolhapur
उघड्यावर कचरा टाकणाऱ्याला एक हजार रुपयांचा दंडकोल्हापूर ः इराणी खण येथे उघड्यावर कचरा टाकणाऱ्यावर महापालिकेने एक हजार रुपयांचा दंड केला. त्याबाबत सामाजिक कार्यकर्त्यांनी संबंधिताचा फोटो टाकला होता. इराणी खण येथे एक व्यक्ती नियमित मटण दुकानातील कचरा टाकत असत. ती व्यक्ती सापडल्यानंतर त्याचा दुचाकीसह फोटो सामाजिक कार्यकर्त्यांनी टाकला. दुचाकी नंबरवरून मालक शोधून कारवाई करावी, अशी मागणी केली. महानगरपालिकेने त्या व्यक्तीला एक हजार रुपयांचा दंड केल्याचे सांगितले. यापुढे सापडल्यास पाच हजारांचा दंड आणि कायदेशीर कारवाई करण्यात येईल, अशी समज देण्यात आली आहे.