Source: Sakal Kolhapur
हणमंतवाडीच्या एकाची कागलमध्ये आत्महत्याकागल : हणमंतवाडी (ता. करवीर) येथील इसमाने येथील एका इमारतीत आत्महत्या केली. रंगराव बाजीराव देशमुख (वय ५०) असे त्याचे नाव आहे. या घटनेची फिर्याद राजाराम लहू आकुर्डे (पिंपळगाव खुर्द) यांनी कागल पोलिसांत दिली आहे.रंगराव देशमुख हे घरात कोणालाही न सांगता घरातून बाहेर पडून कागल येथे आले होते. येथील जयसिंगराव पार्कमध्ये आयसीआरई प्राईड या इमारतीच्या तळमजल्यात असलेल्या रिकाम्या खोलीच्या भिंतीस उभ्या करून ठेवलेल्या लोखंडी शिडीस वायरने गळफास लावून त्यांनी आत्महत्या केली.