Source: Sakal Kolhapur
कागल आगारातून आता पाच ठिकाणी तीर्थाटन सेवानरेंद्र बोते : सकाळ वृत्तसेवाकागल, ता. ५ : श्रावण महिना सुरू आहे, देवदर्शनाला जायची इच्छा आहे, तर त्यासाठी कागल आगार सज्ज झाले आहे. एसटी महामंडळातर्फे श्रावण मास विशेष तीर्थाटन सेवा सुरू केली आहे. अशाच पाच तीर्थाटन सेवा आता कागल आगरातून सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यभरातील विविध आगारांतून अशा सहली एसटी महामंडळाकडून घडविल्या जात आहेत. त्याला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आहे. आता या सेवा कागल आगारातून सुरू करण्यात आली आहे. प्रवाशांच्या मागणी व संख्येनुसार तीर्थाटनाच्या बस सोडल्या जातात. पाचही तीर्थ सेवेला ७५ वर्षांवरील अमृत ज्येष्ठ योजनेअंतर्गत प्रवाशांना मोफत व महिला सन्मान योजनेअंतर्गत महिला प्रवाशांना ५० टक्के सवलत योजना लागू असणार आहे. या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन कागल आगार प्रशासनाने केले आहे. ———–चौकट आगारातील पाच सेवा अशा- कागल – औंध – गोंदवले – शिखर शिंगणापूर (एक मुक्काम गोंदवले)तिकीट दर – पुरुष – ६६० रुपये, महिला ३३० रुपये.- कागल – पंढरपूर – तुळजापूर – गाणगापूर – अक्कलकोट (एक मुक्काम अक्कलकोट)तिकीट दर – पुरुष – १३५० रुपये, महिला ७८० रुपये.- कागल – मार्लेश्वर – गणपतीपुळे – रत्नागिरी तिकीट दर – पुरुष – ६०० रुपये, महिला ३०० रुपये.अकरा मारुती दर्शन पुरुष ५६० रुपये, महिला २८० रुपये.- अष्टविनायक दर्शन (एक मुक्काम ओझर किवा रांजणगाव)तिकीट दर – पुरुष १९५० रुपये, महिला ९७५ रुपये.———चौकटपैशाची बचत व तीर्थाटनाचा आनंद घेता येत असल्यामुळे या योजनेला प्रतिसाद वाढणार आहे. कागल आगार त्यासाठी सज्ज आहे. अधिकाधिक व लवकर बुकिंग करून या तीर्थाटन सेवेचा लाभ घ्यावा.- सागर पाटील, आगार व्यवस्थापक, कागल