Source: Sakal Kolhapur
कसबा सांगाव येथे आज विकासकामांचे लोकार्पण कसबा सांगावः येथे आमदार हसन मुश्रीफ यांच्या माध्यमातून सुमारे सव्वा अकरा कोटी रुपयांच्या विविध विकासकामांचे उद्घाटन आणि लोकार्पण आज, रविवारी (ता.२१) होत आहे. आमदार मुश्रीफ यांच्या हस्ते विविध कामांचे उद्घाटन होणार आहे. ‘गोकुळ’ चे संचालक युवराज पाटील कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी तर जिल्हा बँकेचे संचालक भैय्या माने, माजी सरपंच रणजित कांबळे, राजेंद्र माने प्रमुख उपस्थित असणार आहेत. प्रभाग क्रमांक तीन, चार, पाच आणि सहा मधील अंतर्गत रस्ते, गटारी, पाणंद रस्ता, कसबा सांगाव ते सुळकुड रस्ता रुंदीकरण, मातंग वसाहतीमधील हॉल बांधणे, जैन समाज शेड सुधारणा, दर्गाह रस्ता, मठाची विहीर रस्ता यासह अन्य कामांचा समावेश आहे. रविवारी सायंकाळी साडे पाच वाजता हनुमान मंदिर चौकात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आले आहे.