कर्मवीर जयंती कार्यक्रम

Share on facebook
Facebook
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

शिक्षण संस्थांनी सक्षम व्हावेकुलगुरू शिर्के; साताऱ्यात कर्मवीरांना अभिवादनसकाळ वृत्तसेवासातारा, ता. २२ ः राष्ट्रीय शैक्षणिक धोरणावर अनेक जण टीका करतात; पण फक्त नोकरी करणाराच नव्हे, तर उद्योग व्यवसाय करत नोकऱ्या निर्माण करणारा विद्यार्थी तयार करण्याचा या धोरणाचा उद्देश आहे. या बदलाला सामोरे जाण्यासाठी विद्यार्थी, शिक्षक आणि शिक्षण संस्थांनी सक्षम राहिले पाहिजे, असे मत शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. डी. टी. शिर्के यांनी आज येथे व्यक्त केले. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३५ व्या जयंतीनिमित्त कर्मवीर समाधी परिसरात झालेल्या कार्यक्रमात कुलगुरू डॉ. शिर्के बोलत होते. या वेळी रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. अनिल पाटील, उपाध्यक्ष ॲड. भगिरथ शिंदे, सचिव प्राचार्य डॉ. विठ्ठल शिवणकर, सहसचिव प्राचार्य डॉ. शिवलिंमग मेनकुदळे, सहसचिव प्राचार्य राजेंद्र साळुंखे, प्राचार्य शहाजी डोंगरे, कर्मवीर कुटुंबीय उपस्थित होते. कर्मवीर भाऊराव पाटील, सौ. लक्ष्मीबाई पाटील यांच्या त्यागातून अनेक संघर्षातून ही संस्था उभी राहिल्यानेच संस्था शैक्षणिक क्षेत्रातील सर्व बदल करत यशस्वी वाटचाल करत असल्याचे सांगून कुलगुरू डॉ. शिर्के म्हणाले, ‘‘कोविड काळ हा सर्वांची परीक्षा पाहणारा काळ होता. शाळा बंद ठेवाव्या लागल्या; पण शिक्षण बंद करून परवडणारे नव्हेत. ऑनलाइन शिक्षणात ‘रयत’ने बाजी मारली. हे नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने कौतुकास्पद आहे. आपण शिकतो कशासाठी आणि शिकवतो कशासाठी याचा विचार केला, तर पालक म्हणतील नोकरीसाठी शिकतो; पण या शिक्षणातून नोकरीक्षम विद्यार्थी निर्माण करण्यात आपण कमी पडतोय म्हणूनच हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आले आहे. दूरशिक्षण, आॅनलाइन शिक्षणाला पर्याय राहणार नाही. काळाची पावले ओळखून बदल स्वीकारलेच पाहिजेत.’’या वेळी डॉ. अनिल पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेच्या संघर्षातून झालेल्या वाटचालीची माहिती दिली. प्रारंभी सचिव प्राचार्य डॉ. शिवणकर यांनी संस्थेच्या प्रगतीची माहिती दिली. सहसचिव प्राचार्य डॉ. मेनकुदळे यांनी आभार मानले.

eZy News
LATEST
>>गुंडाचा डोक्यात दगड घालून खून>>आजरा येथे जुगार आड्यावर छापा.>>झुलन गोस्वामीची अखेरची लढत>>Lumpy skin disease : लम्पी स्कीनप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका>>कागल : राष्ट्रवादी पक्षाची विजयाची नांदी – आमदार हसन मुश्रीफ>>चंदगडी हिसका दाखवू>>शिराळा : विश्वास कारखाना वार्षिक सभा>>राक्षीतील घरफोड्याला अटक; वाघबीळ घाटात कारवाई, घरफोडीतील सोन्या-चांंदीचे दागिने जप्त>>शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ देणार नाही – मंत्री केसरकर>>गांधी समजून घेताना>>कोल्हापूरला जयपूर करू -नुतन पालकमंत्री दीपक केसरकर>>म.ह. शिंदे महाविद्यालय>>जातिविहीन व्हा, उच्चनिचतेच्या भिंती जमीनदोस्त करा”>>अन्नपुर्णा’ शुगरचा सोमवारी द्वितीय गळीत हंगाम शुभारंभ>>‘सीबीआय’ कडून कागलमधील तरुणाची चौकशी>>लम्पी>>लव्हटे परिसंवाद>>कोजिमाशिची आज वार्षिक सभा>>नवरात्रोत्सव>>६५ हजारांचे दागिने जप्त
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: