कर्नाटकात गोमुत्र शिंपडून काँग्रेसने शुद्ध केला विधानसभा परिसर, व्हिडिओ व्हायरल

Facebook
LinkedIn
WhatsApp
नवीन विधानसभेच तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. या अधिवेशनापूर्वीच परंपरेनुसार काँग्रेस समर्थकांनी गौमुत्र शिंपडून परिसर शुद्ध केला.

Source: Lokmat National

बंगळुरू – कर्नाटकात काँग्रेसनं एकहाती सत्ता स्थापन केल्यानंतर मुख्यमंत्री व मंत्रीमंडळाचा शपथविधी सोहळा उत्साहात पार पडला. त्यानंतर, आज विधान सौदा म्हणजे कर्नाटक विधानसभेत काँग्रेस आमदारांनी सत्ता स्थापन केल्यानंतर प्रथमच पाऊल ठेवलं. यावेळी, काँग्रेस समर्थकांनी गौमुत्र शिंपडून आणि पूजा करुन हा परिसर पवित्र केल्याचं सांगितलं जात आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून सत्ताधारी काँग्रेस समर्थक एका पुजाऱ्यासह गौमुत्र आणि डेटॉल विधानभवन परिसरात शिंपडताना दिसून येतात. त्यासह, जवळच एक पूजाही मांडण्यात आल्याचे पाहायला मिळते.

नवीन विधानसभेच तीन दिवसीय विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं आहे. या अधिवेशनापूर्वीच परंपरेनुसार काँग्रेस समर्थकांनी गौमुत्र शिंपडून परिसर शुद्ध केला. न्यूज एजन्सी एएनआयने यासंबंधिचा व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामध्ये, काँग्रेस कार्यकर्ता एका बादलीत गोमुत्र घेऊन आहेत, तर पूजा करताना वापरण्यात येणाऱ्या लाकडाच्या सहाय्याने हे गोमुत्र शिंपडल्या जात आहे. अगोदर गोमुत्राच्या बादलीत काठी बुडवली जाते, त्यानंतर ती विधानसभा परिसरात फिरवली जाते. चारही बाजूंनी गोमुत्र शिंपडण्यात आल्याची माहिती आहे. 

दरम्यान, भाजपने भ्रष्टाचार करुन विधानसभा प्रदूषित केल्याचा आरोप काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांनी केला होता. तसेच, काँग्रेसचं सरकार आल्यास विधानसभा परिसरा गोमुत्राने शिंपडून शुद्ध करणार असल्याचंही शिवकुमार यांनी म्हटलं होतं. मात्र, या कार्यक्रमासाठी काँग्रेसचा एकही आमदार किंवा मंत्री सहभागी झाला नव्हता. केवळ, काँग्रेस समर्थकांनीच हा गोमुत्र शिंपडण्याचा कार्यक्रम पूर्ण केल्याचं दिसून आलं.

भाजप सरकारच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध प्रदूषित वातावरण शुद्ध करण्याचा हा प्रयत्न असल्याचं एका समर्थकाने म्हटलं आहे. तर, भाजपने हा तुच्छ कार्यक्रम असल्याचे म्हटले. तसेच, भाजप नेत्यांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध चौकशीचे आदेश देण्यात यावे, असेही एका भाजप समर्थकाने म्हटले. 

 

Marathi News
LATEST
>>कोल्हापूर : वेतवडे येथे धामणी नदीत बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू>>कांदा झाला स्वस्त>>पेठवडगाव: अपघात जोड>>पोलीस कोठडी>>पिवळे सोने झाले मातीमोल>>युथ समिट ऑफ समर अधिवेशन>>सीपीआर रक्षकावर हल्ला गुन्हा दाखल>>Kolhapur : हत्तीवरून मिरवणुकीने कन्याजन्माचे स्वागत; पाटील कुटुंबीयांचा आदर्श उपक्रम>>लॉरी ऑपरेटर्स हेल्मेट>>नेते, संचालक भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पाठीशी>>मुश्रीफ कार्यक्रम>>नागोजीराव पाटणकर हायस्कूल बातमी>>ओबीसी आरक्षण वाढवण्याचा निर्णय चुकीचा ः ॲड.इंदुलकर>>‘आरसीसी-एसईटी’साठी रविवारी स्कॉलरशिप परीक्षा>>भाजप कार्यालय प्रवेश>>जंगम समाज संस्कार शिबीर>>मराठा महासंघ मेळावा>>झूम प्रकल्प पाहणी>>सौंदाळेच्या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू>>प्रकाशन
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: