Source: Sakal Kolhapur
कडवेतून मंगळसूत्र पळविलेआंबा, ता. ३ : कडवे पैकी पाटीलवाडी येथील माधुरी पंडित पाटील या महिलेचे साठ हजार रुपये किंमतीचे मंगळसूत्र अज्ञाताने पळविले. संबंधित महिलेने अज्ञाताविरूद्ध शाहूवाडी पोलिसात फिर्याद दिली आहे. कडवे येथील यात्रेहून येत असताना माधुरी चक्कर येवून पडल्या. त्यांना बघण्यासाठी लोकांची गर्दी जमली होती. त्या बेशुध्द पडल्याचा व अंधार आणि गर्दीचा फायदा घेवून अज्ञाताने त्यांच्या गळयातील मंगळसूत्र पळविले.