Source: Sakal Kolhapur
एमआयडीसी विस्तारीकरणजागेची पाहणीआजरा ः आजरा तालुक्यात मिनी औद्योगिक वसाहत (एमआयडीसी) आहे. या वसाहतीच्या विस्तारीकरणाची मागणी जोर धरू लागली आहे. राधानगरी मतदारसंघाचे आमदार प्रकाश आबिटकर यांचा यासाठी पाठपुरावा सुरु आहे. वसाहतीसाठी लागणाऱ्या जागेची पाहणी एमआडीसीच्या अधिकाऱ्यांनी केली. आजरा शहर व परिसरात असलेल्या तीन ते चार जागांचा स्थळ पाहणी अधिकाऱ्यांनी केली. आजरा एमआयडीसीमध्ये उद्योजक महादेव पोवार यांनी एमआयडीसीचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजी पाटील यांच्यासह मान्यवरांचा सत्कार केला. उद्योजक बाळासाहेब नाईक, अधिक्षक अभियंता, पुणे राजेंद्र गावडे उद्योजक, औद्योगिक विकास महामंडळाचे अधिकारी, दयानंद भुसारी, मारुती मोरे, जितेंद्र भोसले आदी उपस्थित होते.