Source: Sakal Kolhapur
05331जयसिंगपूर: ८० वेळा रक्तदान करणाऱ्या मंगेश पुजारी (नृसिंहवाडी) यांचा क्रांती गणेशोत्सव मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. ———उच्चांकी १२४० जणांचे रक्तदानजयसिंगपूरमध्ये क्रांती गणेशोत्सव मंडळातर्फे आयोजनजयसिंगपूर, ता.२: येथील क्रांती गणेशोत्सव मंडळातर्फे यावर्षी ११११ चे उद्दिष्ट ठेवून रक्तदान शिबिराची जय्यत तयारी केली होती. जयसिंगपूरसह आसपासच्या दात्यांनी शिबिराला भरभरून प्रतिसाद देत १२४० चा नवा उच्चांक प्रस्थापित केला. यावर्षी १ मे रोजी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून रक्तदान शिबीर झाले. कोरोनानंतर रक्ताची निर्माण झालेली टंचाई लक्षात घेता माणुसकीच्या भावनेतून मंडळाने ही परंपरा सुरू ठेवली आहे. आजवर मंडळाने आठशेहून अधिक जणांना मोफत रक्ताचा पुरवठा केला असून गरजू आणि गरीब रुग्णांना मोफत रक्तदान पुरवठा व्हावा हा शिबिरामागील हेतू आहे. शहरापुरते मर्यादित न ठेवता कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील रुग्णांनाही मोफत रक्त पुरवठा केला आहे. आचार्य तुलसी ब्लड बँक, जयसिंगपूर, एम. एस. आय बँक मिरज-सांगली, सिद्धिविनायक गणपती कॅन्सर हॉस्पिटल ब्लड सेंटर मिरज, आदर्श ब्लड बँक सांगली, सिव्हील ब्लड सेंटर सांगली आधी रक्तपेढ्यांचे सहकार्य लाभले.