Source: Sakal Kolhapur
ई – गव्हर्नन्समधून १३४ नागरिकांकडून घरफाळा जमाकोल्हापूर, ता. ४ : ई-गव्हर्नन्स प्रकल्पांतर्गत १३४ नागरिकांनी ऑनलाईन संगणकीय प्रणालीद्वारे घरफाळ्याचा भरणा केला. बारा नववधू-वरांची विवाह नोंदणी या प्रणालीद्वारे करण्यात आली. विवाह नोंदणी प्रमाणपत्रासाठी ऑनलाईन अर्ज सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. एक मे रोजी ई-गव्हर्नन्स प्रकल्पाचे उद्घाटन झाले. याअंतर्गत नागरिकांना विविध सेवा महापालिकेच्या संकेतस्थळ व मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध करून दिल्या आहेत. याचा लाभ नागरिकांना घरातून घेता येत आहे.महानगरपालिकेचे मोबाईल अॅपदेखील सुरू केले असून ते महानगरपालिकेच्या संकेतस्थळावरून डाउनलोड करता येईल. या अॅपवरूनही नागरिकांना विविध सेवा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या प्रकल्पांतर्गत ऑनलाईन सेवेचा तसेच मोबाईल अॅपचा लाभ घ्यावा, असे आवाहन महापालिकेने केले आहे.