Source: Sakal Kolhapur
28409
इलेक्ट्रिक दाहिनीच्या जागेची प्रशासकांकडून पाहणी
कोल्हापूर, ता. ५ : पंचगंगा स्मशानभूमीतील कामाची तसेच इलेक्ट्रिक दाहिनीच्या जागेची आज प्रशासक के. मंजूलक्ष्मी यांनी पाहणी केली. प्रस्तावित २४ बेडचे काम तातडीने सुरू करण्याचे आदेशही दिले.स्मशानभूमीतील १२ बेडच्या सुरू असलेल्या बांधकामाची पाहणी करून प्रशासक मंजूलक्ष्मी यांनी स्मशानभूमीची माहिती घेतली. प्रस्तावित २४ बेडच्या ठिकाणाची पाहणी केली. त्याची निविदा मंजूर झाली असल्याने ते कामही तातडीने सुरू करण्याच्या सूचना शहर अभियंत्यांना दिल्या. गॅस दाहिनीजवळ इलेक्ट्रिक दाहिनी बसविता येईल का याची पाहणीही केली. यावेळी मुख्य आरोग्य निरीक्षकांना परिसरात स्वच्छता ठेवण्याच्या सूचना दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त केशव जाधव, शहर अभियंता हर्षजित घाटगे, उपशहर अभियंता नारायण भोसले, मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ .विजय पाटील, पर्यावरण अधिकारी समीर व्याघ्रांबरे उपस्थित होते.