Archives

इचलकरंजीत आजी-माजी नगरसेवकांसह इच्छुक ॲक्टिव्ह मोडवर

लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : येथील नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आजी-माजी नगरसेवकांसह इच्छुक उमेदवार भागामध्ये ॲक्टिव्ह बनले आहेत. मतदारांच्या किरकोळ कामातही लक्ष घातले जात आहे. परंतु या सगळ्या प्रक्रियेकडे नागरिकांनी डोळसपणे पाहण्याची गरज आहे. कारण नगरपालिकेत सुमारे ७० टक्के आजी-माजी नगरसेवकच स्वत: किंवा कार्यकर्त्यांच्या नावाने ठेकेदार बनले आहेत. त्यामुळे टक्केवारी वाढून धोकादायक वळणावर जाऊन पोहोचली आहे. परिणामी कामाचा दर्जा अतिशय घसरला आहे.निवडणूक जवळ आली की, उमेदवारांकडून मतदारांना आपलंसं करण्याची प्रक्रिया सुरू होते. त्यासाठी त्यांचे किरकोळ शिधापत्रिकांचे काम असेल तरी ते करण्यासाठी खटाटोप केल्याचे दाखवले जाते. आपल्या भागातील सर्व अडचणींचा पाठपुरावा करून भाग सुजलाम् सुफलाम् करणारा ‘मसीहा’ आपणच असल्याचा आव आणला जातो. त्यामुळे नागरिकांची मानसिकता बदलते आणि निवडणुकीत अनेकवेळा असामाजिकत्व असलेली व्यक्ती निवडून येते. तो पुढे जाऊन आपल्या नातेवाईक अथवा कार्यकर्त्याच्या नावाने नगरपालिकेचा ठेकेदार बनतो. प्रत्येक कामात त्याचा हस्तक्षेप सुरू होतो. यामध्ये ‘कारभारी’ असणाऱ्या प्रमुखांना त्यांचा वाटा ठरवून दिला जातो. या सगळ्या प्रकारांमुळे नगरपालिकेची टक्केवारी वाढत जाऊन चक्क ५० टक्क्यांवर पोहोचल्याची चर्चा आहे. याचा विपरित परिणाम विकास कामांवर होतो. एखाद्या प्रामाणिक नगरसेवकाच्या भागात काम सुरू असेल आणि त्याने दर्जाबाबत विचारणा केल्यास आपलाच माणूस आहे, सांभाळून घ्या, अशा सूचना दिल्या जातात. यातूनही आवाज उठविल्यास दुसऱ्या कामात त्याला अडचण करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा कुरघोड्यांमुळे नगरपालिकेची स्थिती दिवसेंदिवस बिकट बनत आहे. यात सुधारणा व्हायची असेल, तर नागरिकांनीच आता डोळसपणे मतदान करणे आवश्यक आहे. चौकटठेकेदारांची परिस्थिती तपासावी विकास कामांत दर्जा अपेक्षित असेल, तर नगरसेवक किंवा त्यांचे नातेवाईक ठेकेदार नसावेत, अशा मार्गदर्शक सूचना आहेत. परंतु याला बगल देत आपल्या कार्यकर्त्यांच्या नावाने अनेकजण ठेका घेतात. संबंधित ठेकेदार कार्यकर्त्याची परिस्थिती पाहता, कोट्यवधींचा ठेका घेण्याची त्याची परिस्थिती नसल्याचे उघडकीस येईल. परंतु याकडे सोयीस्करपणे दुर्लक्ष केले जाते.प्रतिक्रिया…नगरसेवक कार्यकर्त्यांच्या नावाने ठेकेदार बनत असल्याने नगरपालिकेतील टक्केवारीचा विषय गंभीर बनला आहे. परिणामी नगरपालिकेचे आर्थिक गणित कोलमडले आहे. कामाचा दर्जाही घसरला आहे. याला आवर घालणे गरजेचे आहे.- शशांक बावचकर- काँग्रेस प्रदेश सचिव तथा नगरसेवक, इ.न.पा.फोटो ओळी२४०९२०२१-आयसीएच-०८-पालिका इमारतOpen in app

Comments

mood_bad
  • No comments yet.
  • Add a comment
    • No products in the cart.