Source: Sakal Kolhapur
02815निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर)—–इंदोरीकर महाराजांना शिवप्रेमी पुरस्कारप्रकाश पाटील; गुरुवारी संभाजीराजे छत्रपती यांच्याहस्ते वितरणटोप, ता. २ : येथील शिवसेना प्रणित शिवप्रेमी ग्रुपतर्फे देण्यात येणारा शिवप्रेमी राज्य गौरव पुरस्कार निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांना जाहीर झाला आहे. या पुरस्काराचे वितरण माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते गुरुवारी (ता. ४) सायंकाळी ७.३० वाजता होणार असल्याची माहिती शिवप्रेमी राज्य गौरव पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्रकाश पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधनातील योगदानाबद्दल इंदोरीकर महाराज यांना पुरस्कार दिला आहे. गुरुवारी (ता. ४) सायंकाळी साडेसात वाजता टोप येथील श्री शाहू माध्यमिक विद्यालयाच्या क्रीडांगणावर पुरस्कार वितरण होणार आहे. वस्त्रोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष पुंडलिक जाधव, शिवसेना नेते अनिल खवरे, हातकणंगले पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. प्रदीप पाटील, शिरोली एमआयडीसीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक सागर पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य बाजीराव पाटील, विठ्ठलपंत पाटील, सुरेश यादव प्रमुख उपस्थित आहेत.