Source: Sakal Kolhapur
00401
खिलाडूवृत्तीने खेळाचा आनंद लुटा
श्रीराम पवार : ‘सकाळ’-”एचआर फोरम’तर्फे आयोजित इंडस्ट्रियल क्रिकेट लीगच्या चषकाचे अनावरण
कोल्हापूर, ता. ४ : खिलाडूवृत्तीने क्रिकेट खेळून खेळातील आनंद लुटा, असे आवाहन सकाळ माध्यम समूहाचे मुख्य संपादक श्रीराम पवार यांनी आज येथे केले. सकाळ माध्यम समूह व ‘एचआर फोरम इंडिया- कोल्हापूर’ यांच्या संयुक्त विद्यमाने पहिल्या ‘इंडस्ट्रियल क्रिकेट लीग २०२३’ स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेतील चषकाच्या अनावरण प्रसंगी ते बोलत होते.शिवाजी उद्यमनगरमधील ‘सकाळ’ कार्यालयात हा कार्यक्रम झाला. या वेळी श्री. पवार म्हणाले, ‘सकाळ यिन, तनिष्का, एनआयई व्यासपीठाच्या माध्यमातून वैविध्यपूर्ण उपक्रम घेत आहे. समाजात बदल घडविण्यासाठी जागल्याची भूमिका घेऊन काम करत आहे. उद्योग क्षेत्रातील कर्मचाऱ्यांनी खेळाचा मनमुराद आनंद लुटता यावा, यासाठी स्पर्धेचे आयोजन केले आहे. कर्मचाऱ्यांनी खिलाडूवृतीचे दर्शन घडवून स्पर्धा अविस्मरणीय करावी.’ ‘माने सराफ’च्या विद्या जगताप व एचआर फोरम इंडियाचे कोअर कमिटी मेंबर अनंत पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी ‘सकाळ’चे उपसरव्यवस्थापक रवींद्र रायकर, मुख्य बातमीदार निवास चौगले, सहायक सरव्यवस्थापक (जाहिरात) आनंद शेळके, सहायक व्यवस्थापक (इव्हेंट) सूरज जमादार, एचआर फोरम इंडियाचे कोअर कमिटी मेंबर संजय बेनके उपस्थित होते.—————चौकटनामांकित संस्थांचा सहभागदत्ताजीराव परशुराम माने सराफ स्पर्धेचे मुख्य प्रायोजक, सिनर्जिक सेफ्टी शूज सहप्रायोजक, तर वेलेटा-विथ मिनरल हायड्रेशन पार्टनर आहेत. शास्त्रीनगर मैदानावर ९ ते २१ मे दरम्यान स्पर्धा होईल. एचआर फोरम इंडिया ही कोल्हापुरातील एच आर अधिकाऱ्याची संस्था आहे. इंडस्ट्रियल क्रिकेट लीगमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील नामांकित संस्था या स्पर्धेत सहभागी होत आहेत.————–स्पर्धेतील सहभागी संघ मौर्या ग्रुप, ट्रेंडी व्हिल्स- कोल्हापूर, साई सर्व्हिस प्रायव्हेट लिमिटेड, बँक ऑफ बडोदा, लोकनेत सदाशिवराव मंडलिक सहकारी साखर कारखाना, रॉकेट इंजिनिअरींग, सेरा फ्लक्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, व्ही. पी. टूल्स, सरोज ग्रुप, जीपीआय ग्रुप, सुयश ग्रुप, एस. बी. रिसेलर्स, वारणा ग्रुप, किर्लेास्कर ब्रदर्स, दाना कोल्हापूर, केओईएल, सॅनर्जी ग्रीन, युनिकेम लॅब, सप्रे, दाना ग्रुप, विलो, गोकुळ दूध संघ, कॅस्प्रो, कोटक महिंद्रा बँक.