Source: Sakal Kolhapur
gad41.jpg : 00399कृष्णात घोरपडे, अजित उत्तूरकर, संदीप पाटील——————————-‘इंजिनिअर्स’च्या अध्यक्षपदी कृष्णात घोरपडेगडहिंग्लज : येथील अर्किटेक्टस् अॅण्ड इंजिनिअर्स असोसिएशनच्या नव्या पदाधिकाऱ्यांची निवड केली. कृष्णात घोरपडे यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. अजित उत्तूरकर व संदीप पाटील यांच्यावर उपाध्यक्षपदाची जबाबदारी सोपवली आहे. राजेंद्र पाटील यांची सचिवपदी तर राजेंद्र देशमाने यांची खजिनदारपदी निवड झाली आहे. बैठकीला रमेश गायकवाड, संजय नाईक, दयानंद गुरव, श्रीरंग राजाराम, दत्ताराम पाटील, अशोक रोटे, राजेंद्र देसाई, शैलेंद्र कावणेकर, बाजीराव पाटील, अमित मिसाळ आदी उपस्थित होते. ————————–‘ओंकार’मध्ये डॉ. बांदिवडेकर यांचा सत्कारगडहिंग्लज : येथील ओंकार शिक्षण संस्थेतर्फे डॉ. तुषार बांदिवडेकर यांचा सत्कार केला. डॉ. बांदिवडेकर यांची नुकतीच ओरल अॅण्ड मॅक्झीलो फेशल विभागाच्या प्रमुखपदी निवड झाली आहे. त्याबद्दल हा सत्कार केला. प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण अध्यक्षस्थानी होते. संस्थेच्या उपाध्यक्षा डॉ. ऋतुजा बांदिवडेकर, संचालक उध्दव इंगवले उपस्थित होते. डॉ. डी. जी. चिघळीकर यांनी प्रास्ताविक केले. प्रा. स्वयंप्रभा सरमगदूम यांनी आभार मानले.—————————‘ओंकार’मध्ये संशोधन विषयावर कार्यशाळागडहिंग्लज : येथील ओंकार महाविद्यालयात शोधनिबंध व संशोधन प्रकल्प लेखन कसे करावे या विषयावर कार्यशाळा झाली. संशोधन समितीतर्फे ही कार्यशाळा झाली. प्रा. स्वयंप्रभा सरमगदूम अध्यक्षस्थानी होत्या. पहिल्या सत्रात प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश चव्हाण यांनी शोधनिबंध लेखन कसे करावे याविषयी तर दुसऱ्या सत्रात अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. काशिनाथ तनंगे यांनी संशोधन प्रकल्प लेखन कसे करावे या विषयावर मार्गदर्शन केले. डॉ. शर्मिला घाटगे यांनी प्रास्ताविक केले. डॉ. ज्ञानराजा चिघळीकर यांनी पाहुण्यांचा परिचय करुन दिला. प्रतिक्षा दुंडगे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. अनिल पाटील यांनी आभार मानले.