Source: Sakal Kolhapur
01924इंगळेवाडीच्या विकासासाठी प्रयत्नशील ः आबिटकर पिंपळगाव ः इंगळेवाडीच्या विकासासाठी प्रयत्नशील आहे. नव्या रस्त्यामुळे इंगळेवाडी जगाच्या नकाशाला जोडली आहे, असे प्रतिपादन जिल्हा बँकेचे संचालक प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी केले. बारवे पैकी इंगळेवाडी (ता. भुदरगड) येथील ग्रामस्थांनी आयोजित केलेल्या सत्कारावेळी ते बोलत होते. आनंदा पाटील अध्यक्षस्थानी होते. स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनंतर वाडीला पक्का रस्ता केला आहे. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नातून रस्ता पूर्ण झाला. रस्ता होण्यासाठी प्रा.अर्जुन आबिटकर यांनी पाठपुरावा केला. म्हणून ग्रामस्थांतर्फे प्रा. आबिटकर यांचा सत्कार झाला. राजाराम इंगळे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी बचाराम इंगळे, मारुती इंगळे, तुकाराम इंगळे, तानाजी इंगळे, जोतिबा इंगळे, भिकाजी यमगेकर, बाळकृष्ण इंगळे, जयदीप इंगळे, विनायक इंगळेंसह ग्रामस्थ उपस्थित होते. एन. आर. इंगळे यांनी आभार मानले.