Archives

आशा, गटप्रवतर्कांचा पंचायत समितीवर मोर्चा

गारगोटी : कोरोना महामारीच्या कालावधीत जिवावर उदार होऊन काम करणाऱ्या आशा, गटप्रवर्तकांना ग्रामपंचायतीने थकीत वाढीव मानधन त्वरित द्यावे, यासह इतर मागण्यांसाठी आशा व गटप्रवर्तकांनी भुदरगड पंचायत समितीवर शुक्रवारी मोर्चा काढला. मागण्या त्वरित मान्य न केल्यास उपोषणाचा निवेदनाद्वारे इशारा देण्यात आला आहे. जिल्हा परिषदेचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी अमन मित्तल व सध्याचे संजयसिंह चव्हाण यांनी, ग्रामपंचायतींनी एप्रिल २०२० पासून एक हजार रुपयेप्रमाणे फरकासहित प्रोत्साहनपर भत्ता द्यावा, असा आदेश देऊनही याची अंमलबजावणी केलेली नाही. आशा, गटप्रवर्तकांचा थकीत भत्ता त्वरित द्यावा, अन्यथा १ ऑक्टोबरपासून उपोषण करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन सहायक गटविकास अधिकारी शिरीष भोकरे यांना देण्यात आले. आंदोलनात जिल्हाध्यक्षा प्रतिभा इंदूलकर, कविता सुर्वे, नीता काशीद, कविता पाटील, रंजना लोहार, स्मिता देसाई, अनिता नलवडे, अनुराधा ढेरे, लता गोडसे, सुनयना देसाई, शीतल पाटील, शोभा कांबळे यांच्यासह तालुक्यातील सर्व आशा सेविका, गटप्रवर्तक उपस्थित होत्या.फोटो ओळआपल्या विविध मागण्यांचे निवेदन सहायक गटविकास अधिकारी एस. एस. भोकरे यांना आशा सेविकांनी दिले. यावेळी पी. ओ. पोवार, प्रतिभा इंदूलकर, कविता सुर्वे, नीता काशीद, कविता पाटील, रंजना लोहार आदी उपस्थित होते.२४ गारगोटी आशा स्वयंसेविकाOpen in app

Comments

mood_bad
  • No comments yet.
  • Add a comment
    • No products in the cart.