Source: Sakal Kolhapur
आळतूर येथे कामगारांना मारहाणआंबाः आळतूर पैकी धनगरवाडा येथे घराचे काम करणाऱ्या पाच बिगारी कामगारांना मारहाण करण्यात आली. कामगारांना काठी, कोयता व लाथाबुक्यांनी मारहाण करून जखमी केले. याप्रकरणी येथील सिद्धू टारे याच्या विरूद्ध शाहूवाडी पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसातून मिळालेली माहिती अशी की, टारे याच्या घराचे बांधकाम सुरू आहे. बांधकामाचे थर वाढवा म्हणून कामगारांना त्याने सांगितले. कामगारांनी आमच्या काँन्ट्रॅक्टरना विचारा, असे उत्तर दिल्याने टारे याने कामगारांना कोयता, काठी व लाथाबुक्यांनी मारहाण केली.