आत्महत्या

Share on facebook
Facebook
Share on linkedin
LinkedIn
Share on whatsapp
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

बेपत्ता अल्पवयीन मुलगी गडचिरोलीतकागल : कागल तालुक्यातील १३ वर्षांची अल्पवयीन मुलगी दोन दिवसांपूर्वी बेपत्ता झाली होती. आज ती गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात असल्याचे समजल्याने कागल पोलिसांचे पथक तिला ताब्यात घेण्यासाठी गडचिरोलीला गेले आहे. संबंधित अल्पवयीन मुलगी मैत्रिणीच्या घरातून अभ्यास घेऊन येते, असे सांगून सोमवारी (ता. १९) सायंकाळी घरातून निघून गेली. तिची शोधाशोध करूनही ती मिळून न आल्याने पालकांनी तक्रार नोंदवली होती. ती मुलगी गडचिरोली येथे बस स्थानकावर पोहोचल्यावर तेथील विक्रेत्याने व एका शिक्षकाने तिला गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात दिले होते. आज ती गडचिरोली पोलिसांच्या ताब्यात असल्याचा निरोप कागल पोलिसांना आला. मुलीला आणण्यासाठी महिला उपनिरीक्षक, हवालदार व महिला पोलिस असे पथक रवाना झाले आहे.

२६९१मरळीतील एकाची आत्महत्याकळे : मरळी (ता. पन्हाळा) येथे एकाने आत्महत्या केली. दीपक आनंदा पाटील (वय ४०) असे त्यांचे नाव आहे. दीपकचा दहा वर्षांपूर्वी विवाह झाला होता. ते शेती व दुग्धव्यवसाय करत होते. मरळी येथील नंदीवाले वसाहत येथे ते सहा महिन्यांपूर्वी भाऊ राजाराम व दाजी पाटील यांच्यापासून विभक्त राहत होते. बुधवारी (ता.२१) त्यांनी त्यांची पत्नी रेखाला माहेरी बाजार वेतवडे (ता. पन्हाळा) येथे पाठविले व रात्री गळफास घेऊन आत्महत्या केली. सकाळी थोरला भाऊ राजाराम जनावरांना वैरण घालण्यासाठी गेले असता त्यांना घडला प्रकार निदर्शनास आला. त्यांच्या मागे पत्नी, आई- वडील, दोन भाऊ, पुतणे असा परिवार आहे. रक्षाविसर्जन शनिवारी (ता. २४) आहे.

गिरगावातून दागिने चोरीसकंदलगाव ः गिरगाव (ता. करवीर) येथे झालेल्या घरफोडीत चोरट्याने ७० हजारांचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी इस्पुर्ली पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. रविवारी (ता. १८) ते बुधवारच्या दरम्यान चोरट्याने घरात प्रवेश करून शिलाई मशिनवरील पर्समधून चावी घेऊन तिजोरीतील तोळ्याचे गंठण, टॉप्स जोडी व सोन्याचे ब्रेसलेट असे ७० हजाराचे सोन्याचे दागीन्यांची चोरी केल्याची फिर्याद गीता अभिजित करोशी (मूळ रा. इचलकरंजी, सध्या रा. गिरगाव) यांनी इस्पुर्ली पोलिसात दिली. हेडकॉन्स्टेबल पी. टी. मांडवकर व विजय कांबळे तपास करीत आहेत.

उत्तूरमधून मोटार चोरीसउत्तूर ः उत्तूर – गारगोटी रिंग रोडवर पार्क केलेली मोटार बुधवारी रात्री चोरीला गेली. याबाबत शिवाजी ईश्वर मापटे यांनी पोलिसांत फिर्याद दाखल केली. मापटे यांनी सायंकाळी साडेसहा वाजता मोटार लावून घरी गेले. सकाळी सात वाजता मोटार आणण्यासाठी गेल्यावर ती गायब झाल्याचे आढळले. मोटारीची किमंत चार लाख रुपये आहे. तपास हवालदार राजेश आंबूलकर करीत आहेत.

कारखान्यातून तांब्याची तार चोरीसउजळाईवाडी ः कागल पंचतारांकित औद्योगिक वसाहतीतील ओम इलेक्ट्रिकल इंजिनिअर्स लिमिटेड कारखान्याच्या गेटचा पत्रा उचकटून तांब्याच्या ताराचे बंडल व एमएस ब्रास रॉड असा एक लाख ४७ हजाराच्या तांब्याच्या तारा व रॉडची चोरी झाली आहे. पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी, विक्रम सदाशिव कोरवी (कोरवी गल्ली, कागल) यांच्या मालकीच्या कागल औद्योगिक वसाहतीतील प्लॉट नंबर डी १७४ ओम इलेक्ट्रिकल इंजिनिअर कारखान्यामध्ये बुधवारी (ता. २१) गेटचा पत्रा वाकवून व खिडकीचे गज कापून तांब्याच्या तारांचे बंडल पळविले. विक्रम कोरवी यांनी फिर्याद दिली. चोरट्याविरुद्ध गोकुळ शिरगाव पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. अधिक तपास महिला पोलिस उपनिरीक्षक प्रणाली पवार करीत आहेत.

ढोणेवाडीतील तरुणाची आत्महत्याइचलकरंजी : ढोणेवाडी (ता. निपाणी) येथील तरुणाने येथे झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. दादासो जिवबा बेनाडे (वय २४) असे त्याचे नाव आहे. याची नोद शिवाजीनगर पोलिसात झाली आहे. त्याला शहरातील आयजीएम रुग्णालयात दाखल केले; पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. मृत बेनाडे याने आज दुपारी शेतातील झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

खोतवाडीतील शेतकऱ्याला सर्पदंशमाजगाव ः शेतात औषध फवारणीसाठी गेलेल्या खोतवाडी (ता. पन्हाळा) येथील युवा शेतकरी किसन युवराज अतिग्रे (वय ३१) यांना सर्पदंश झाला. आज सकाळी जाधवपट्टी नावाच्या शेतात ते औषध फवारणीसाठी गेले होते. औषध फवारणी करताना त्यांच्या उजव्या पायाला सापाने दंश केला. मित्रांनी तात्काळ अतिग्रे यांना सीपीआरमध्ये दाखल केले आहे. त्यांची प्रकृती स्थिर आहे.

मारहाण प्रकरणी सहा जणांवर गुन्हाकोल्हापूर, ता. २२ ः क्रांतिसिंह नाना पाटीलनगर येथे एकास मारहाण केल्याप्रकरणी करवीर पोलिस ठाण्यात सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला. दीपक मुळीक, प्रथमेश मुळीक आणि तिघे अनोळखी अशी त्या संशयितांची नावे आहेत. हा प्रकार काल घडला. अशी फिर्याद जखमी हेमंत कोवळे यांनी दिल्याचे पोलिसांनी सांगितले.

इलेक्ट्रीक मोटारीची चोरीकोल्हापूर ः कात्यायणी कळंबा परिसरातून चोरट्याने १२ हजार रुपये किमतीची इलेक्ट्रीक मोटार चोरून नेली. हा प्रकार मंगळवारी सायंकाळी निदर्शनास आला. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली.

दोन मोटारसायकलची चोरीकोल्हापूर ः सानेगुरुजी वसाहत आणि बाजारगेट परिसरातून चोरट्याने दोन मोटारसायकल चोरून नेल्या. याची नोंद जुना राजवाडा आणि लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्यात झाली.

पाण्याच्या बंबची चोरीकोल्हापूर ः सुभाषनगर परिसरात दारात ठेवलेले १५ किलो वजनाचे दोन तांब्याचे बंब चोरट्याने चोरून नेले. हा प्रकार मंगळवारी (ता.२०) निदर्शनास आला. याची नोंद राजारामपुरी पोलिस ठाण्यात झाली.

eZy News
LATEST
>>कोल्हापूरचा विकास जयपूरसारखा करू; केसरकर>>गुंडाचा डोक्यात दगड घालून खून>>आजरा येथे जुगार आड्यावर छापा.>>झुलन गोस्वामीची अखेरची लढत>>Lumpy skin disease : लम्पी स्कीनप्रकरणी उच्च न्यायालयात जनहित याचिका>>कागल : राष्ट्रवादी पक्षाची विजयाची नांदी – आमदार हसन मुश्रीफ>>चंदगडी हिसका दाखवू>>शिराळा : विश्वास कारखाना वार्षिक सभा>>राक्षीतील घरफोड्याला अटक; वाघबीळ घाटात कारवाई, घरफोडीतील सोन्या-चांंदीचे दागिने जप्त>>शिक्षणाचा खेळखंडोबा होऊ देणार नाही – मंत्री केसरकर>>गांधी समजून घेताना>>कोल्हापूरला जयपूर करू -नुतन पालकमंत्री दीपक केसरकर>>म.ह. शिंदे महाविद्यालय>>जातिविहीन व्हा, उच्चनिचतेच्या भिंती जमीनदोस्त करा”>>अन्नपुर्णा’ शुगरचा सोमवारी द्वितीय गळीत हंगाम शुभारंभ>>‘सीबीआय’ कडून कागलमधील तरुणाची चौकशी>>लम्पी>>लव्हटे परिसंवाद>>कोजिमाशिची आज वार्षिक सभा>>नवरात्रोत्सव
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: