Source: Sakal Kolhapur
03342राधानगरी : ट्रेलरची चाके चोरांसह पोलिस…..
ट्रेलरची चाके चोरीप्रकरणी आणखी एकाला अटक
राशिवडे बुद्रुक : ट्रेलरची चाके चोरून नेल्याच्या येळवडे (ता.राधानगरी) येथील घटनेतील आणखी एकाला बुधवारी पोलिसांनी अटक केली. संशयित आरोपींची संख्या तीन झाली असून त्यांना सहा मे पर्यंत तीन दिवसांची पोलिस कोठडी दिली आहे. येथील कृष्णात ईश्वरा पाटील यांच्या दत्त मंदिराशेजारील शेतात लावलेल्या ट्रेलरची चाके चोरीस गेली होती. याप्रकरणी सांगरूळमधील विनायक शिवाजी कुंभार व विजय आनंदा कुंभार यांना मंगळवारी अटक केली होती. बुधवारी तेथील शुभम सुरेश खाडे याला अटक करण्यात आली. संशयितांना राधानगरी न्यायालयाने सहा मे पर्यंत पोलिस कोठडी दिली आहे. या तिघांकडून ट्रेलरचे तिन्ही टायर व मोटारीसह दोन लाख पाच हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. पोलिस निरीक्षक स्वाती गायकवाड, उपनिरीक्षक विजयसिंह घाटगे, अरविंद पाटील, के. डी. लोकरे, गजानन गुरव, कृष्णात यादव हे अधिक तपास करीत आहेत.