Source: Sakal Kolhapur
देवकांडगावजवळील अपघातात महिला ठार
आजरा, ता. ४ ः आजरा गारगोटीमार्गावर देवकांडगाव घाटात दुचाकी रस्त्यावरून घसरून झालेल्या अपघातात महिला जागीच ठार झाली. आज दुपारी साडेबारा वाजता अपघात झाला. शोभा संजू चव्हाण (वय 38, रा. समुद्रवाणी, ता. जि. उस्मानाबाद) असे त्या महिलेचे नाव आहे. आजरा पोलिसांत अपघाताची नोंद झाली आहे. चव्हाण कुटुंबीय हे मुळचे उस्मानबाद जिल्ह्यातील आहे. उपजिविकेसासाठी ते व त्यांचे नातेवाईक कोल्हापूर जिल्ह्यात आले आहेत. हे कुटुंबीय सध्या नवले (ता. भुदरगड) येथे राहत असून, लोहारकाम करून कुटुंबाची उपजिविका चालवत होते. आज सकाळी शोभा चव्हाण व त्यांचे पती संजू चव्हाण हे चाफवडेकडे (ता. आजरा) दुचाकीवरून चालले होते. संजू हे मोटारसायकल चालवत होते. देवकांडगाव घाटात त्यांना धोकादायक वळणांचा अंदाज आला नाही. त्यामुळे त्यांचा दुचाकीवरील ताबा सुटला. दुचाकी रस्त्यावरून घसरली. दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या शोभा या रस्त्याच्या बाजूपट्टीवर फेकल्या गेल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. संजय चव्हाण जखमी झाले. पोलिस अंमलदार चेतन घाटगे तपास करीत आहेत.
चौकटदैव बलवत्तर म्हणूनचव्हाण दाम्पंत्याबरोबर त्यांचा चार वर्षांचा मुलगा सुमीतही दुचाकीवर होता. अपघात झाल्यावर रस्त्याच्याकडेला फेकला गेला. पण, त्याचे दैव बलवत्तर असल्याने त्याला किरकोळ दुखापत झाली.
चौकटपोलिसांची अशीही मदतचव्हाण कुटुंबाची परिस्थिती हालाखीची आहे. ते पाहून पेरणोली बीटचे अंमलदार चेतन घाटगे यांनी चव्हाण कुटुंबीयांना अत्यंविधीसाठी लागणाऱ्या साहित्याकरीता आर्थिक मदत दिली तसेच चव्हाण यांचा मृतदेह रुग्णवाहीकेतून लातूरला नेण्यात येणार असून, प्रवास खर्चासाठी मदत केली.