Source: Sakal Kolhapur
आजऱ्यातील घरफोडीमधील संशयित ताब्यातआजरा ः येथील आपटे कॉलनीत झालेल्या घरफोडीतील एका संशयिताला आजरा पोलिसांनी ताब्यात घेतले. रजाक अब्दुल मुजावर (रा. नांदरे, ता. मिरज, जि. सांगली) असे त्याचे नाव आहे. आजरा शहरात गस्त घालत असताना नाकाबंदीदरम्यान संबंधित संशयित मिळाला आहे. मुजावर हा संशयितरीत्या मोटारसायकलवरून फिरत होता. पोलिसांनी त्याच्याकडील मोटारसायकलची चौकशी केली व कागदपत्राबाबत विचारणा केल्यावर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे पोलिसांचा संशय बळवला व मुजावरकडील गाडी चोरीची असल्याचे स्पष्ट झाले. दहा दिवसांपूर्वी आपटेनगरमध्ये सुनील गणपती नाईक यांच्या बंद घराचा कडीकोयडा उचकटून दागिने व मोटारसायकल पळवली होती. त्यांची ही मोटारसायकल आहे. सहायक पोलिस निरीक्षक सुनील हारुगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस तपास करीत आहेत.