आजरा ः आजरा साखर कारखाना

Facebook
LinkedIn
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

आजरा कारखान्याची प्रारुप मतदार यादी जाहीर

११ मे पर्यंत हरकती ः २२ मे पर्यंत निर्णय

आजरा, ता. २ ः आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याची प्रारुप (कच्ची) मतदार यादी प्रसिध्द झाली आहे. या यादीवर (ता.११) मे पर्यंत हरकती व आक्षेप स्वीकारण्यात येणार आहेत. २२ मे पर्यंत हरकतीवर निर्णय घेतला जाणार आहे. त्यामुळे जून महिन्यात कारखान्याची निवडणूक होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना सुरवात झाली आहे. आजरा साखर कारखान्याच्या विद्यमान संचालक मंडळाची मुदत मे २०२१ मध्ये संपली आहे. कोरोना व अन्य कारणांमुळे कारखान्याची निवडणूक लांबणीवर पडली. त्यामुळे ३० जूनपुर्वी मुदत संपलेल्या कारखान्याची निवडणूक घेण्यात यावी, त्या दृष्टीने प्रशासकीय पातळीवर तयारी करण्यात यावी, असे प्रादेशिक सहसंचालक साखर यांनी याबाबतचे आदेश दिले आहेत. त्यामुळे आजरा साखर कारखान्याच्या `ब` वर्ग संस्था सभासद प्रतिनिधींची ठराव दाखल करण्याची प्रक्रिया महीनाभरात पूर्ण झाली असून एकूण १६५ संस्था सभासदांपैकी १२० संस्थांनी आपले ठराव दाखल केले आहेत. कारखान्याकडे अ वर्ग उत्पादक सभासद २५ हजार १८१ आहेत. ७ हजार ४३८ ब वर्ग अनुत्पादक व्यक्ती सभासद आहेत. कारखान्याकडे सभासद असलेल्या ४५ संस्थांचे मुदतीत ठराव प्राप्त झालेले नाहीत. २० एप्रिलला संस्था ठराव प्रक्रिया पूर्ण झाली. प्रारुप मतदार यादी आज प्रसिध्द झाली असून या यादीवर ११ मे पर्यंत हरकती दाखल करता येणार आहेत. २२ मे पर्यंत निर्णय दिला जाणार आहे. मतदार यादी आजरा तहसलीदार कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय आजरा, जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा निवडणूक अधिकारी तथा प्रादेशिक सह संचालक कार्यालय कोल्हापूर व आजरा साखर कारखान्यावरील नोटीस बोर्ड लावण्यात आली आहे…. * पंधरा दिवसात पक्की मतदार यादी

हरकतीची अंतिम तारीख ११ मे पर्यंत आहे. या कालावधीत हरकती आल्या नाहीत तर पंधरा दिवसात अंतिम यादी प्रसिध्द होणार आहे. हरकतींवर २२ मे पर्यंत निर्णय़ घेतला जाणार आहे.

Marathi News
LATEST
>>कोल्हापूर : वेतवडे येथे धामणी नदीत बुडून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू>>कांदा झाला स्वस्त>>पेठवडगाव: अपघात जोड>>पोलीस कोठडी>>पिवळे सोने झाले मातीमोल>>युथ समिट ऑफ समर अधिवेशन>>सीपीआर रक्षकावर हल्ला गुन्हा दाखल>>Kolhapur : हत्तीवरून मिरवणुकीने कन्याजन्माचे स्वागत; पाटील कुटुंबीयांचा आदर्श उपक्रम>>लॉरी ऑपरेटर्स हेल्मेट>>नेते, संचालक भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या पाठीशी>>मुश्रीफ कार्यक्रम>>नागोजीराव पाटणकर हायस्कूल बातमी>>ओबीसी आरक्षण वाढवण्याचा निर्णय चुकीचा ः ॲड.इंदुलकर>>‘आरसीसी-एसईटी’साठी रविवारी स्कॉलरशिप परीक्षा>>भाजप कार्यालय प्रवेश>>जंगम समाज संस्कार शिबीर>>मराठा महासंघ मेळावा>>झूम प्रकल्प पाहणी>>सौंदाळेच्या तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू>>प्रकाशन
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: