Source: Sakal Kolhapur
00371…
मोटार झाडावर आदळून जवान ठार
आजरा – नेसरी मार्गावर किणे येथे दुर्घटना
नेसरी ता. ३ ः किणे (ता. आजरा) येथे आजरा – नेसरी मार्गावर झालेल्या मोटारीच्या अपघातामध्ये मसणू धोंडीबा मणगुतकर (वय २८, रा. तावरेवाडी, ता. गडहिंग्लज) हे जवान ठार झाले. गाडीवरील ताबा सुटल्याने आज दुपारी हा अपघात घडला. रात्री उशीरापर्यंत या घटनेची पोलिसात नोंद झाली नव्हती. घटनास्थळावरून मिळालेली माहीती अशी, मणगुतकर हे आपल्या मामांच्या मुलीच्या लग्नासाठी सुटीवर आले होते. काही कामानिमित्त ते आजऱ्याकडे मोटारीने निघाले होते. त्यांचा गाडीवरील ताबा सुटल्याने मोटार रस्त्याकडील एका झाडावर जावून आदळली. यामध्ये मोठी दुखापत होऊन ते गंभीर जखमी झाले. उपचारासाठी त्यांना नेसरी ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले, मात्र तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला. मनगुतकर हे २०१४ मध्ये सातारा येथे सैन्यात भरती होते झाले. त्यांनी शिख रेजीमेंटमधून लेह, लडाख व लखनौ येथे पाच वर्ष सेवा बजावली होती. त्यांच्या मागे आई, वडील, दोन भाऊ, बहीण असा परिवार आहे.