Source: Sakal Kolhapur
0158शाहू छत्रपती गोल्ड कप स्पर्धेचा थरार आजपासून कोल्हापूर, ता. २ : के. एस. ए.च्या वतीने श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या ७५ व्या वाददिवसाचे औचित्य साधून शाहू छत्रपती गोल्ड कप अखिल भारतीय फुटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. स्पर्धेला उद्या (ता. ३) पासून येथील छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरुवात होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना श्री शिवाजी तरुण मंडळ विरुद्ध उत्तरेश्र्वर तालीम मंडळ यांच्यात सकाळी आठला होईल. संध्याकाळी साडेचार वाजता फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळ विरुद्ध पाटाकडील तालीम मंडळ-ब यांच्यामध्ये लढत होणार आहे. स्पर्धेचे संध्याकाळी चारला उद्घाटन श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी डॉ. राहुल रेखावार यांच्या हस्ते होईल. जिल्हा पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे अध्यक्षस्थानी आहेत. यावेळी डॉ. डी. वाय. पाटील समूहाचे अध्यक्ष डॉ. संजय पाटील, सागर कुलकर्णी उपस्थित असणार आहेत. पहिल्या फेरीतील स्थानिक सर्व सामन्यांसाठी तिकीट दर २० रुपये व पूर्वेकडील स्टेडियमधील बैठक व्यवस्थेसाठी १० रुपये राहणार आहे. महिलांसाठी मैदानाच्या दक्षिण बाजूला के. एस. ए. कार्यालयासमोर बैठक व्यवस्था आहे.