fbpx
Site logo

अवकाळी पावसाने नुकसान झालेचे पंचनामे करावेत

Facebook
LinkedIn
WhatsApp

Source: Sakal Kolhapur

अवकाळीने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी

तुरुकवाडी : शाहूवाडी तालुक्यात अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे शासनाने तातडीने पंचनामे करावेत, अशी मागणी सरपंच प्रा . वंदना ठोंबरे यांनी निवेदनाद्वारे केली आहे. निवेदनात म्हटले आहे की, शाहूवाडी तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने प्राथमिक शाळांची छते, घरांची पडझड, याशिवाय मका, केळी, नारळ फळबाग , विद्युत पोल यांची पडझड झाली आहे. महसूल व कृषी विभागाने प्रत्यक्ष घटनास्थळी भेट देऊन पंचनामे करावेत. तसेच तातडीने नुकसान भरपाई देण्याची व्यवस्था करावी. दरम्यान, ‘तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची सूचना महसूल व कृषी विभागाला दिल्या असल्याचे शाहूवाडीचे तहसीलदार गुरु बिराजदार यांनी सांगितले.

Marathi News
[pj-news-ticker]
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: