Source: Sakal Kolhapur
चौदाजणांवर गुन्हा दाखल
कोल्हापूर ः अल्पवयीन मुलीचा विवाह करून ती गर्भवती राहिल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याची नोंद करवीर पोलिस ठाण्यात झाली आहे. अठरा वर्षापेक्षा कमी वय असतानाही मुलीचा विवाह करण्यात आला. त्यातून ती दीड महिन्यांची गर्भवती राहिल्यामुळे उपचारासाठी सीपीआरमध्ये आली. त्यानंतर गर्भवतीची फिर्याद घेवून बालविवाह प्रतिबंध अधिनियमानुसार करवीर पोलिसांनी १४ जणांवर गुन्हा दाखल केला.