Source: Sakal Kolhapur
05336जयसिंगपूर: अनेकांत इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये विद्यार्थी, पालकांना आवकाशगंगेचे दर्शन घडवून माहिती देण्यात आली.
”अनेकांत” मध्ये अवकाशगंगेचे दर्शनजयसिंगपूर, ता.३: येथील अनेकांत इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये मंगळवारी (ता.२) रात्री विद्यार्थी-पालकांना स्कायलाइन टेलिस्कोपद्वारे अवकाश दर्शन घडवले. यावेळी ग्रह ताऱ्यांची माहिती देण्यात आली. अनेकांत इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजमध्ये उन्हाळी शिबिराचे औचित्य साधून निरभ्र अवकाशात ग्रह ताऱ्यांचे दर्शन घडवून आणले. यामुळे बालचमुंच्या मनातील अनेक प्रश्नांना उत्तरे मिळाली. अध्यक्षस्थानी अप्पासाहेब भगाटे होते. डॉ. महावीर अक्कोळे, महावीर पाटील, स्कूलचे सी.ई.ओ. अभिजीत अडदंडे, मुख्याध्यापिका प्रिया गारोळे व भावना मुचंडीकर उपस्थित होते. जयसिंगपूर कॉलेजमधील प्राध्यापक डॉ. प्रशांत चिक्कोडे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथील अवकाश संशोधनाचा अभ्यास करणारे नागेश कोठावळे, अक्षय माने, प्रितम इंगळे, सम्यक संबोधी या विद्यार्थ्यांनी प्रोजेक्टरद्वारे आकाशगंगेचे संपूर्ण ज्ञान विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांना सोप्या भाषेत करून दिले. शिवाजी विद्यापीठातून आणलेला स्काय लाइन टेलिस्कोपद्वारे व इतर दुर्बिण व लेसरद्वारे विद्यार्थ्यांना व पालकांना आकाशगंगेतील ग्रहांचे जवळून दर्शन घडवून आणले. कल्याणी अक्कोळे, यश चिक्कोडे व जयश पाटील यांचेही सहकार्य लाभले. संध्याकाळी सहा ते दहा यावेळेत जयसिंगपूर कॉलेजच्या क्रीडांगणावर मुलांनी प्रकाशलेले अवकाश मनमुरादपणे अनुभवले.