fbpx
Site logo

अदानीही देणार गणपती मंडळांना घरगुती दराने वीज

Facebook
LinkedIn
WhatsApp
लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : टाटा पॉवरनंतर आता अदानी वीज कंपनीनेही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घरगुती दराने वीज देणार असल्याची ...

Source: Lokmat Maharashtra

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : टाटा पॉवरनंतर आता अदानी वीज कंपनीनेही सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना घरगुती दराने वीज देणार असल्याची घोषणा केली. विशेषत: अर्ज केल्यापासून ४८ तासांत वीजजोडणी दिली जाईल, अशी माहिती कंपनीने दिली आहे.  वीजजोडणीसाठी आवश्यक अर्ज सादर करण्यासाठी www.adanielectricity.com संकतेस्थळाला किंवा अन्य मदतीसाठी नजीकच्या कार्यालयाशी संपर्क साधवा, असे आवाहनही मंडळांना करण्यात आले आहे.

विसर्जनस्थळी रोषणाईगणेशमूर्ती विसर्जनस्थळी फ्लडलाइटसह रोषणाई उपलब्ध असेल. गणेश मंडळांनी भाविकांच्या सुरक्षेची खात्री करण्यासाठी अधिकृत परवानाधारक वीज कंत्राटदाराकडूनच वीजजोडणीचे काम करून घ्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

मंडळांनी काय करावे?  जोडणीसाठी मानक असलेल्याच वायर व स्वीचचा वापरा करा.  कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत सिंगल आयसोलेशन पॉइंट ठेवा.  वायरचे टॅपिंग योग्यरीत्या करा.  मीटर केबिनमध्ये आणि स्वीच कनेक्शनपर्यंत योग्य प्रवेश सुविधा ठेवा.  मंजूर भारापेक्षा अधिक वीजभार नसावा.  बॅकअपसाठी जनरेटर वापरत असल्यास जनरेटर यंत्र आणि न्यूट्रल यांचे योग्यरीत्या अर्थिंग करा.

 

Marathi News
[pj-news-ticker]
Browse by category:

Kolhapur

Maharashtra

National

International

Entertainment

Sports

Health

Lifestyle

Browse by brands: