Source: Sakal Kolhapur
राधानगरीत ग्रामपंचायतींसाठी अकरा अर्ज दाखल
राधानगरी : राधानगरी तालुक्यात पोटनिवडणूक होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या पाच जागांसाठी अकरा उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या पाच गावांपैकी हसणे आणि हेळेवाडी या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी प्रत्येकी एकेक अर्ज दाखल झाल्याने येथील जागा बिनविरोध झाल्यात जमा आहेत. तर उरलेल्या तीन पैकी वलवन दोन, बर्गेवाडी तीन व तळगावसाठी चार उमेदवारी अर्ज आले आहेत. अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी आठ मे ला अंतिम चित्र स्पष्ट होईल.।